महालक्ष्मी विदयालयाचा तालुकास्तरावर कबड्डी स्पर्धांत मानाचा तुरा.

१७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड.
अकोले/प्रतिनिधी–
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोले तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मारूतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुल व वसुंधरा अकॅमेडी अकोले येथे संपन्न झाल्या.
यावेळी १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघात तालुक्यातील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय पिंपळगाव नाकविंदा येथील संघाने नेत्रदिपक कामगिरी करत तालुकास्तराव यश संपादन केले.
कर्णधार ऋतुजा गायकवाड,स्नेहल पथवे,अक्षदा जाधव,वैष्णवी वाघमारे,प्रियंका साबळे,दिव्या तातळे,सपना मेंगाळ,भावना बगनर,सपना मेंगाळ,नयना मेंगाळ,अपुर्वा गायकवाड आदि खेळाडूंनी तालुक्यातील अनेक दिग्गज संघांना पराभूत करून तालुकास्तरावर प्रथम येण्याचा मान पटकवला.सदर संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.या खेळाडूंना राज्यपंच क्रिडाशिक्षक अनिल चासकर, रामदास कासार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर, सेक्रेटरी मंगेश नवले, प्राचार्य सुनिल धुमाळ, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे, क्रिडा समितिचे अध्यक्ष योगेश उगले,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाळीबा लगड,पोलिस पाटील चंद्रभान लगड,महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र घोटी येथील देवचंद काळे यांसह पिंपळगाव नाकविंदा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,सदस्य तसेच ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.