दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथे कामगार मेळावा

नांदेड–भारतीय मजदूर संघ संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा 14 आक्टोबर स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथे समरसता दिनाच्या निमित्ताने कामगार मेळावा संपन्न झाला.
नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर, सेक्रेटरी अनुप जोंधळे, बांधकाम कामगार संघांचे सरचिटणीस संजय सुरवसे, व प्रमुख वक्ते सचिन मेंगाळे सरचिटणीस महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ उपस्थित होते
भारतीय मजदूर संघाचे देश हीत, ऊद्योग हीत, कामगार हीत, व ग्राहक हित, असेच सुत्र मांडून कामगार चळवळ , संघटना राजकारणा पासून अलिप्त असली पाहिजे असाच विचार मांडला आहे त्यानुसार भारतीय मजदूर संघ हा देशभरातील शोषित पिडीत वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात कार्यरत आहे . तरी भारतीय मजदूर संघात कामगारांनी एकजुटीने सहभागी होऊन अन्याय च्या विरोधात आवाज उठवावा असे आवाहन सचिन मेंगाळे यांनी यावेळी केलं
नांदेड येथे समरसता दिनाच्या निमित्ताने झालेल्या मेळावा मध्ये अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर होते, मंचावर जिल्हा सचिव अनुप जोंधळे यांनी प्रास्ताविक केले बांधकाम कामगार संघांचे सरचिटणीस संजय सुरवसे यांनी श्रमीक गीत, परिचय करून दिला, मेळावाचे आभार प्रदर्शन गजानन तोकलवार यांनी केले आहे.

या वेळी प्रमुख कार्यकर्ते गजानन कुंतुरकर, गजानन शेमदाडे आदी पदाधिकारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.या वेळी नांदेड मधील विद्युत विभाग, बॅंक ऊद्योग , बांधकाम कामगार, घरेलु कामगार, सहकारी बॅंक ऊद्योग , तसेच वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.