आबिटखिंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ५५ इंची स्मार्ट टिव्ही ची भेट

ग्रामपंचायतचे शाळेला नेहमी सहकार्य राहील
: सरपंच यमुना घनकुटे
कोतुळ प्रतिनिधी
: आबिटखिंड ग्रामपंचायतचे शाळेला नेहमी सहकार्य राहील. शाळेची गुणवत्ता चांगली आहे ती तशीच राहावी व मुलांना आधुनिक शिक्षण घेता यावे म्हणून काय करता येईल
यादृष्टीने शिक्षक आणि ग्रामपंचायतच्या समन्वयाने शाळा विकास केला जाईल. असे प्रतिपादन सरपंच यमुना घनकुटे यांनी केले.
आबिटखिंड (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबिटखिंड येथे ग्रामपंचायत कडून ५५ इंची स्मार्ट टिव्ही भेट देण्यात आला. ग्रामपंचायत ने शाळेला टिव्ही दिल्याबद्दल शाळेच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सौ. घनकुटे बोलत होत्या.

यावेळी उपसरपंच ओंकार भारमल, माजी सरपंच भानुदास गोडे, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम घनकुटे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर जगधने, ग्रामपंचायत सदस्य सीमा गोडे, कल्पना भोजने, भाऊराव गंभिरे, नंदा भोजने, रामनाथ भोजने, ग्रामसेवक राजेंद्र सुकटे, सुरेश गोडे, सुधाकर गोडे, भरत घनकुटे, सर्वोदय चे मुख्याध्यापक डी.डी. फापाळे,
मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, दत्तात्रय घनकुटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान भांडकोळी सोमनाथ मुठे, भास्कर दिघे, विकास भागीत, कैलास राऊत, अनिल भोजने, धनंजय घनकुटे, विमल भोजने, खोकले तात्या, जनार्दन भांडकोळी, शरद भोजने, दिनेश गोडे, शिवाजी वाजे, भाऊ भोजने, लता गोडे, सुलाबाई भवारी यांच्यासह ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच ओंकार भारमल म्हणाले, विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून व डिजीटल शिक्षण घेता यावे यासाठी ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करीन.
यावेळी माजी सरपंच भानुदास गोडे, भाऊराव गंभिरे, सर्वोदय चे मुख्याध्यापक डी.डी. फापाळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, सुधाकर गोडे, भरत घनकुटे, कैलास राऊत, सीमा गोडे, साहेबराव भांडकोळी, गणपत तिटकरे यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सोमनाथ मुठे यांनी केले.