मराठा आरक्षण गणोरे येथे साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

सुशांत आरोटे
गणोरे प्रतिनिधी
गणोरे ता.अकोले येथे मराठा योद्धा श्री मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गणोरे येथील सकल मराठा समाज वतीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
साखळी उपोषणाचा इशारा सरकारे लवकरात लवकर मराठा बांधवांना न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यावे. अश्या तीव्र स्वरूपाच्या भावना मराठा समाजाच्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी समस्थ मराठा बांधवांना लागून राहिली आहे.
सकल मराठा समाज वतीने साखळी उपोषणाला काल पासून गणोरे गावातील महिला,पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक,युवती, कॉलेजचे विद्यार्थी तसेच सर्वच घटकातील मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावाच्या वतीने असलेल्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. जसे जसे शासन ह्यात वेळकाढू धोरण अवलंबिले तसे हे आंदोलन तीव्र स्वरूपाच्या होणार आहे.
काल पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा ला हार घालून मोठ्या संख्येने साखळी उपोषणाला सुरुवात झाली.संपूर्ण दिवस भर ज्येष्ठ नागरिक उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्रीं युवक व गावातील नागरिक उपस्थित होते.आजही सकाळ पासून उपोषण स्थळी गर्दी होत आहेत.प्रत्येक जण आपापल्या परीने उपोषणात सहभागी होत आहेत. ज्या नागरिकांना जसा जसा वेळ मिळेल तसे उपोषण स्थळी हजेरी लावून पाठिंबा द्यावा.
गावातील भजनी मंडळे आज उपोषण स्थळी भजन करणार आहे. महिला मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
मराठा बांधवांनी आरक्षणासाठी भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे अशी मागणी करण्यात येत आहे.