राजुर येथे गौरी गणपती उत्सवात स्थापना

राजूर /प्रतिनिधी
परपारिक गौरी, सणाला सुरवात झाली असून मुली प्रमाणे सासरी गेलेल्या मुलीच माहेरी आगमन झाले आहे भावाच्या रूपाने घरातील पुरुष जंगलातील गौरी पूजनाची फुले घेऊन दरवाज्यात येतात घरातील सुवासनी मार्फत तिची ओवाळणी करून संपूर्ण घरा मध्ये गेरू चुण्याच्या पावलांनी फिरवून स्वयंपाक घरात बसवली जाते अशा गौरी सणाला शहरात उत्सवाने सुरवात झाली आहे, शहरी भागात गौरीची फुले विक्री करण्यासाठी बाजारपेठा दोन दिवस अगोदरच सजल्या आहेत दरवर्षी प्रमाणे यंदा जंगलात गौरीच्या फुलांची किमतीत वाढ झाली आहे, गौरी सणाला अडीच दिवसाचा कालावधी असतो पहिला दिवस मानपान स्वागत दुसऱ्या दिवशी आवडीचे जेवण तिसऱ्या दिवशी माहेरवासीन सासरी जाण्याची तयारी तिच्या बरोबर मिष्ठान पद्धार्थ दिले जातात फुलांच्या गौरीस विसर्जनास ओढ्यावर केले जाते मूर्तीचे विसर्जन नदी पात्रात, तलावात केले जाते प्रत्येक घराघरात गौरीचा उत्सव साजरा होताना गोडधोड पद्धार्थ बनवले जातात.
माणसाच्या जीवनात वर्ष भर, ऊर्जा जागृत रहाते लहान मुला, मुली सणात भाऊ बहिणीचे नाते घट्ट करतात मुलगी आई बाबांचा जीवनप्रवाह आणि पारंपरिक सणाच्या आठवणी जागृत ठेवतात गौरीचे प्रकार प्रत्येक भागात वेगवेगळे आहेत त्या प्रमाणे काही घरामध्ये शहरात महागड्या मुखवट्याचे पुतळे बसवून त्याना शिंगार चढवला जातो गणरायाची आरती सकाळ दुपार संध्याकाळी रात्री केली जाते गौरी सणाच्या आगमनाची चाहूल आनंदी तसेच गौरी विसर्जनाची चाहूल निराश जनक रहाते या महिन्यात फळे, फुले, भाजीपाल्याला अधीक मांगणी असते.