पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची राजुर येथे गणेश मंडळांना भेट

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशउत्सव च्या पार्श्वभूमीवर राजूर येथील विविध गणेश मंडळांस पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले .

तसेच विसर्जन मिरवणुकीस लवकर सुरुवात करून शासनाने दिलेल्या वेळेत वेळेत विसर्जन करावे तसेच गणपती विसर्जन च्या वेळेस कोणत्याही गालबोट लागणार नाही याची प्रत्येक मंडळांनी काळजी घ्यावी .गणपती विसर्जन शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनास मदत करावी .यावेळी श्रीमंत अवधूत मंडळ, जय संताजी मंडळ, शिवदत्त मंडळ, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ , जय माता दी मंडळआधी सह विविध मंडळास भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी सर्व मंडळांनी आश्वासन दिले आमच्याकडून कोणत्याही कायद्याचे भंग होणार नाही याची दक्षता घेऊ.यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे स .पो. नि. प्रविण दातरे , पो.कॉ विजय फटांगरे पो. कॉ धराडे पो. कॉ. मालुंजकर सह सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते
