क्राईम

पत्नीनेच साथीदारांच्या मदतीने  पतीचा कोयत्याने गळा कापून खून केला!


संगमनेर खुर्द येथील हत्या प्रकरणी
3 आरोपी जेरबंद

संगमनेर शहर पोलीसांची कामगिरी

संजय साबळे

संगमनेर प्रतिनिधी


पत्नीचेच आपल्या पतीला यमसदनी पाठविले  दोघा साथीदारांच्या मदतीने तिने पतीच्या गळ्यावर  कोयत्याने वार केले पतीला  रक्ताच्या थारोळ्यात पाडले  गळा कापून निर्घृण  खून केला असल्याची घटना उघडकीस आली

या  प्रकरणाची हकिगत अशी की, दिनांक 15.09.2023 रोजी सकाळी 08.30 वाजण्याचे सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील रमेश पंढरीनाथ सुपेकर यांचे शेतालगतचे प्रवरा नदीच्या पात्रात एक प्रेत पालथ्या अवस्थेत तरंगताना दिसुन आले होते व प्रेतालगत नदी काठावर रक्ताचे थारोळे होते. सदरची माहिती प्राप्त होताच संगमनेर पोलीसांनी तात्काळ घटना ठिकाणी जावुन प्रेताची पाहणी केली असता सदरचे प्रेत हे मारुती आबा डामसे वय 41 वर्षे हल्ली रा संगमनेर खुर्द ता संगमनेर मुळ रा कोपरे ता जुन्नर जि पुणे याचे असुन त्याचे गळा हा धारधार हत्याराने कापलेला दिसला. सदरचा खुन हा त्याची पत्नी दिपाली मारुती डामसे हीने तिचे साथीदारांसोबत केलेबाबत फिर्यादी पांडुरंग आबा डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुरनं 797/2023 भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली सदर
गुन्ह्याचा तपास सुरु करुन एकुण 3 पोलीस पथके तयार करुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन सर्वात प्रथम सदर गुन्ह्यातील मयताची पत्नी आरोपी 1) दिपाली मारुती डामसे हीस ताब्यात घेवून तिस अटक करुन तिचेकडे तपास केला असता तीने सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे देत तपासाची दिशा भरकाटवली. त्यानंतर तांत्रिक गोष्टीचा तपासात आधार घेवून सदर महिला आरोपीचे साथीदार 2)
रमेश तुकाराम भले वय 36 वर्षे रा येणेरे ता जुन्नर 3) गणेश बाळशीराम भालेकर वय 35 वर्ष रा काटेडे ता जुन्नर जि पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून गुन्ह्यात वापरलेले

हत्याराबाबत विचारपुस केली असता आरोपी नं 2 रमेश तुकाराम भले याने त्याचेकडील लॉखडी कोयत्याने मयतास मारुन खुन करुन तो चंदनापुरी घाटात फेकुन दिलेबाबत
कळविले. त्यानुसार सदर आरोपी कडुन गुन्ह्यात वापरलेला लोंखडी कोयता हा तपासात जप्त करण्यात आला असुन सदर आरोपींची दिनांक 25.09.2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. तपासी पथकाचे या कामगिरीमुळे असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसविलेला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो व मा. अपर पोलीस
अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ वाघचौरे सो यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, सुनिल माळी, संगमनेर शहर स्टेशन नेमणुकीचे, सफो रावसाहेब
लोँखडे, पोहेकॉ शिवाजी भांगरे, पोना अनिल गवळी, मपोना लता जाधव, ज्योती दहातोंडे, पोकॉ विशाल कर्पे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, रोहीदास शिरसाठ, अजित कुऱ्हे, कानिफनाथ जाधव, गणेश थोरात, रामकिसन मुकरे, महादु खाडे तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालय
श्रीरामपुर चे पोकॉ सचिन धनाड, आकाश बहिरट यांनी केली असुन पुढील तपास हे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button