आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी राज्यात आंदोलनाचा निर्णय

अकोले प्रतिनिधी
आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी होऊ नये धनगर व मराठा समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाचे आरक्षणाला धक्का लागू न देण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
महाराष्ट्र विधिमंडळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याअध्यक्षतेखाली आदिवासी आमदारांची नुकतीच बैठक संपन्न झाली.
या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले, आ.डॉ किरण लहामटे ,आ. राजेश पाटील, आ. सुनील भुसारा, आ. मंजूळा गावित, आ. आमश्या पाडवी, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज असो किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण मिळणार नाही. धनगर समाज किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर द्या परंतु आदिवासी समाजामधे आरक्षण देऊ नये.
येत्या ७ ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथे रेल रोको आंदोलन तसेच १२ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आंदोलन त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन होणार आहेत.