खामगाव – हिंगणगाव ने येथील हरिप्रसाद पाणी वापर संस्थेच्या चेअरमनपदी नंदा नारळकर तर सचिवपदी बाबूलाल पटेल

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील खामगाव – हिंगणगाव ने या मुळा पाटबंधारे विभागाच्या टेलच्या भागातील पाणी वापरातील उत्तम नियोजन असणाऱ्या हरिप्रसाद पाणी वापर संस्थेची पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली.
चेअरमनपदी नंदाताई शंकरराव नारळकर यांची बिनविरोध निवड करण्यात तर संचालक म्हणून निसार हसमुद्दीन पटेल, सुधाकर मोहन विघ्ने, अर्जुन दशरथ नजन,लक्ष्मीबाई नवनाथ नजन, साहेबराव रंगनाथ पवार, नारायण पुंजा वने,सहदेव यादव खेडकर, पांडुरंग कारभारी बडधे,अन्सार रशीद पठाण, तुकाराम पथाजी वाघमारे, रुबाब्बी हसमुद्दीन पटेल,यांच्याही बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सचिव बाबूलाल पटेल, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, कल्याण सावंत, महादेव आहेर,वसंत आहेर, दिलीप जनार्दन सावंत, आप्पासाहेब कमानदार,लक्ष्मण आगळे, सोमनाथ डांगरे, अरुण पवार, बाबासाहेब ढवळे, अशोक मंत्री पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवडीचे लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी अभिनंदन केले आहे.