राजूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा.

राजूर/प्रतिनिधी–
राजूर येथीलअँड्.एम.एन.देशमुख महाविदयालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकोले महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. यासीन सय्यद हे होते.
‘खेड्याकडे परत चला’ हा महात्मा गांधीजींचा संदेश घेऊन आपणास खेड्याची प्रगती व विकास साध्य करावयाचा आहे. खेड्याची प्रगती झाली तरच देशाचा सामाजिक विकास होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. यासीन सय्यद यांनी केले. श्रमप्रतिष्ठा, नीतिमूल्ये, एकता,निष्ठा, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, समस्या निराकरण, सांघिक भावना हे गुण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वाढीस लागू शकतात त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेला देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे ही ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अँड्.एम.एन.देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिना निमित्त ते बोलत होते.
आपल्या जीवनाला आकार देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे. असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.वाय.देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे तीनशे स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एल.बी.काकडे यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.थोरात बी.के.यांनी केले तर आभार प्रा.डॉ. एन.यू.देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. डी.बी.तांबे, डॉ. पी.टी.करंडे ,डॉ.व्ही.एन.गिते, प्रा.बी.एच.तेलोरे, श्याम पवार यांसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.