इतर
वाघापूर येथील सोपान लांडे यांचे निधन

अकोले(प्रतिनिधी)-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कुंभेफळ येथील शेषनारायण विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक सोपान मनाजी लांडे (वय- 59,रा. वाघापूर,ता.अकोले)यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले .अकोले तालुक्यात क्रीडा संकुल होण्यासाठी ते अविरतपणे काम करत होते.
त्यांHच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर वाघापूर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.