राजुर पोलिसांनी दिला गणरायाला निरोप !

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
राजूर पोलीस स्टेशन च्या गणेशाची आज मोठ्या उत्सहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली या वेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे पाय आज मात्र ब्रॉस बँड च्या गाण्यांवर मनसोक्त थिरकताना दिसले.
एरवी नेहमी पोलीस आरोपीच्या गरडेतअसणारे आणि कामाच्य ताणतणाव मध्ये आपल्या आनंदात मुरड घालत नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी कायम तत्पर असणारे पोलीस दल रुबाबदार फेटा व कुर्ता घालून आनंद घेताना दिसून आले.

यावेळी सहकाऱ्यांनी आपले पोलीस आधिकारी प्रविण दातरे यांना अक्षरशा खांद्यावर घेऊन नृत्य केले..या वेळी फेटा आणि कुर्ता हा पेहराव राजूर शहर वासियांचे आकर्षण ठरत होता.
सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी गणपतीची पूजा करून स्वागत केले तर विद्यमान विद्यमानआ.डॉ किरण लहामटे यांच्या सुविधा पत्नी सौ पुष्पाताई लहामटे यांनी स्वागत केले यावेळी राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे शशिकांत ओहरा,दर्शन ओहारा गौरव माळवे ,अड.दत्ता निगळे यांनी मिरवणूक सहभाग घेत गणरायाच्या निरोपाच्या मिरवणुकीत गाण्यांच्या तालावर सर्व पोलीस कर्मचारी यांनी ठेका धरला होता.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शेख ,पोलीस कॉन्स्टेबल विजय फटांगरे अशोक गाडे,कैलास नेहे ,सुवर्णा शिंदे , वाडेकरआदी सह बहुसंख्याने कर्मचारी उपस्थित होते.
