हिंदू धर्म वाचविण्यासाठी, पक्ष, आणि पार्ट्या गावाबाहेर ठेवण्याचा इंदुरीकर महाराजांचा सल्ला

अकोले ( प्रतिनिधी )
हिंदू धर्म वाचविण्यासाठी राजकारण, पक्ष, पार्ट्या गावच्या बाहेर ठेवा, धर्म टिकला तर आपण वाचणार आहोत. असा सल्ला ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर यांनी कळस येथे कीर्तन पुष्प गुंफताना दिला.
कृपाळ सज्जन तुम्ही संतजन,
एवढे कृपादान तुमचे मज ||
या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना इंदुरीकर महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस बू येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, छत्रपतीनी स्वाभिमान शिकवला, सप्ताह चा फायदा गावाला नाही, शेतकऱ्यांचा बाप वृद्धाश्रमात नाही. कीर्तनात धर्म टिकला पाहिजे यासाठी कार्य करावे लागेल. धर्मांतर करून आज पोरी पळून जात आहे. कुऱ्हाड नामाची घेऊन अज्ञान ची मुळी, अहंकार चे खोड अन स्वहाकार ची बारा फांद्या तोडा मनुष्य जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी देव्हाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवावे. आज कुटुंब व्यवस्था बरबाद झाली. भजन केले तर देहाचे मंदिर होते. जन्मला येऊन माळकरी होण, भजन करण स्वाभिमान विकला गेला.
यावेळी दिपक महाराज देशमुख, अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के.डी. धुमाळ, नितीन महाराज देशमुख, ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, मृदंगाचार्य ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, गायकवृंद अरुण महाराज शिर्के, रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे हार्मोनियम वादक सूर्यकांत ढगे, विणेकरी गंगा बाबा वाकचौरे, चोपदार बाजीराव ढगे व रामनाथ चासकर हे उपस्थित होते.
ह.भ.प. विष्णू महाराज वाकचौरे कळस यांनी प्रवचन सेवा केली. संगमनेर साखर कारखाना चे माजी संचालक सीताराम वाकचौरे व श्री. गोरख भुसारी यांनी संतपंगत दिले बद्दल आम्रवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
कोट:- कळस ग्रामपंचायत च्या वतीने ” वारकरी भूषण २०२३ ” प्रवचनकार, कीर्तनकार, मृदूंगाचार्य, चार पिढ्याचे वारकरी, कळसेश्वर भजनी मंडळाचे सदस्य, कळस सप्ताह चे मार्गदर्शक ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे यांना समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. आई, वडील, मामा, पत्नी, मुले असा परिवारिक सत्कार करण्यात आला.