इतर
कोतुळ येथील बेपत्ता शांताराम चा मृतदेह मुळा नदीत सापडला !

कोतुळ प्रतिनिधी1
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी असलेले शांताराम भाऊसाहेब देशमुख वय 55 हे गेल्या महिना भरा पासून बेपत्ता झाले आहे होते एक महिन्या नंतर आज शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह कोतुळ येथे मुळा नदी पात्रात पाण्यावर तरंगलेलल्या अवस्थेत आढळून आला अकोले पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
कोतुळ येथून दि २५ ऑगस्ट२०२३ रोजी दुपारी १२.३०वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेले मुलगा राजेंद्र शांताराम देशमुख याने दिलेल्या खबरी वरून सुरवातीला अकोले पोलिसांनी ९७/२०२३ नुसार मिसिंग चा गुन्हा नोंदविला होता एक महिन्यानंतर मुळा नदी पात्रात मृतदेह आढळला सायंकाळी कोतुळ येथे त्यावर अंत्यसंस्कर करण्यात आले