रुग्णालयांचे डायरेक्टर….

जागतिक परिचारिका दिन विशेष
रुग्णालयात जाता ……….
. सेवा कोण करतं…..
डॉक्टर आधी नाव येतं… परिचारिकेचं
डॉक्टर तपासतात.. औषध देतात… शस्त्रक्रिया करतात.. पण वेदनेवर फुंकर घालण्याचे काम मात्र परिचारिकाच करतात. त्यांना नसते तमा वेळेची… नसते परवा स्वतःच्या कुटुंबाची.. अहोरात्र गुंतलेल्या असतात रुग्ण सेवेची…
हो आज जागतिक परिचारिका दिन.
जगातील, माझ्या भारत देशातील, माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या अहमदनगर जिल्ह्यातील, आणि माझ्या नगर शहरातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांना परिचारिका दिनानिमित्त एक मानाचा सलाम…
आज परिचारिका दिन ज्यांच्या नावाने आपण साजरा करत आहोत त्या म्हणजे पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल. यांचा जन्म १२ मे १८२० मध्ये झाला. फ्लॉरेन्स यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली आणि जगाला रुग्णसेवेचा वसा दिला. आपल्यातील काही भगिनींना रोजगाराची संधी मिळेल त्या स्वावलंबी कशा बनतील या उद्देशाने लंडनमध्ये१८६९ साली पहिले नर्सिंग स्कूल सुरू झाले. आज आपल्या महाराष्ट्रात सुमारे अडीच लाखाहून अधिक परिचारिका कार्यरत आहेत. सरकारी आरोग्य विभाग २३००० परिचारिका सांभाळत आहेत तर ८० टक्के परिचारिका खासगी रुग्णालयात सेवा देत आहेत.
खरंच या परिचारिकेची एक अजब कहाणी…….. नवजात शिशू पासून ते वयोवृद्धांपर्यंत, रिसेप्शन पासून ओपीडी पर्यंत, जनरल वॉर्ड पासून आयपीडी पर्यंत, ओ टी पासून आय सी यु पर्यंत, एन आय सी यु पासून एच आय डी यू पर्यंत सगळीकडे कार्यरत दिसणाऱ्या या परिचारिका कधी इमर्जन्सी मध्ये बिझी..
कधी डॉक्टरांकडे बिझी.. कधीही आराम नाही.. डॉक्टरांनी आवाज द्यावा.. लगेच जावे..
जाताजाता रुग्णांकडे बघून छोटेसे स्मित द्यावे..
कधी डिस्चार्ज पेशंटला रस्ता दाखवावा.. तर कधी एडमिशन साठी आलेल्यांना व्हीलचेअरचा आधार द्यावा.. डॉक्टर चिडले तरी यांनी मात्र गप्प बसावे.. एकही शब्द फिरून कोणतेही प्रत्युत्तर न द्यावे..
रुग्णालयात येतात वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट..
कोणी असते नरम कोणी असते गरम.. कोणी असते हसत.. कोणी असते रडत.. कोणी असते गरीब.. कोणी असते आमिर..परंतु परिचारिकेसाठी सर्वजण मात्र असतात हृदयापासून सेवेशी बांधील.. काही जण येतात..
प्रमोशन साठी दाखवतात फक्त इमोशन..
परिचारिका सतत मग्न असते सांभाळण्यात सर्विस स्टेशन.. सतत असते सवय सुई,सिरींज, मलमपट्टी औषधांची..घरी हातात लाटणे असेल तरी विचार मात्र रूग्णाच्या रिकव्हरीची..
कधी मिळेल हो या परिचारिकांना मनाची शांतता.. रुग्णां बरोबर कुटुंबाचीही काळजी..
कधी संपेल ही उद्विग्नता.. त्यांच्याही घरी होत असतील ना रुसवे-फुगवे..
परंतु रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या ना चेहऱ्यावर दाखवावे लागतात आनंदाचे लेणे..
देवाचे दुसरे रूप डॉक्टर असते.. पण परिचारिकेचे कॅरेक्टर ही काही कमी नसते.. मानलं खरं डॉक्टर आहे रुग्णालयांचे डायरेक्टर..
ट्रीटमेंटसाठी सुरू होतो आधी परिचारिकेचा चाप्टर.. डॉक्टरांना असते उपचाराचे महत्त्व.. परिचारिका देते सर्वात जास्त ममत्व..
खरंच कोणी समजून घेईल का या परिचारिकांना? आज यांचेही प्रश्न भेडसावत आहेत. तुटपुंज्या पगारावर यांना काम करावे लागत आहे.घेऊ यात का जबाबदारी यांना किमान वेतन कायदा आणण्याची? प्रयत्न करूया का यांना कायद्याचे संरक्षण देण्याची? कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कंपाउंडर कधीकधी रुग्णांकडूनही शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसा विचार केला तर या रुग्णसेवेत आनंदापेक्षा दुःखाला सामोरे जावे लागत आहे. पण तरीही एखाद्या वृक्षासारख्या व्रतस्थपणे या परिचारिका आपली रुग्णसेवा प्रामाणिकपणे पार पाडून आपली भूमिका बजावत आहेत. स्वतःचे दुःख विसरुन सतत रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या या देवदूत रुपी सर्व परिचारिकांना पुन्हा एकदा मानाचा सलाम.
जाता जाता यांच्यासाठी.. तू नर्स आहेस..
तू फर्ज आहेस..
तू अर्ज आहेस..
आम्हाला अभिमान वाटतो तुझा..
मदर टेरेसा च्या आदर्शांवर चालणारी तिचेच रूप घेऊन वावरणारी तू जगाच्या इतिहासात एक मात्र दर्ज आहेस.. तू आहेस माणुसकीचा स्तंभ.. तू आहेस सभ्यतेचा कणा..
तू आहेस सुह्रदयतेचा वृक्ष..
तू आहे समाजाचा आधार.. म्हणूनच आज आम्ही सर्व जण करत आहोत तुला आणि तुझ्या रूग्णसेवेला हात जोडून नमस्कार..
आपली
अनुरिता झगडे
शहर महिला अध्यक्ष.बारा बलुतेदार महासंघ अहमदनगर
जिल्हा अध्यक्षा माववधिकार संघटना महिला संरक्षण समिती अहमदनगर
भ्रष्टाचार जनआरोग्य अत्याचार आक्रोश समिती महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.या
8956627925.