राजुर येथे पोलिसांचा रूट मार्च

राजूर, दि.१८ (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कायद्याचा धाक निर्माण व्हावा व येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी राजूर पोलिसांनी रूटमार्च काढण्यात आला होता.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजूर पोलीस स्टेशन हद्दीत एस आर पी एफ चे अधिकारी – अंमलदार, स्वतः, पो.स्टे.चे दुय्यम अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत राजूर या गावांमध्ये रूट मार्च काढण्यात आला.

गुरूवारी रुटमार्चसाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला या वेळी तीन पोलीस अधिकारी, वीस पोलीस अंमलदार, दहा होमगार्ड व बी.एस.एफ चे अधिकारी व अंमलदार हजर होते. सायंकाळी 5 वाजता पिचड बंगला, महादेव मंदिर ,बाजारपेठ ,दत्त मंदिर असा रूट मार्च करण्यात आला
रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा पाहिल्याने अनेकांना धडकी भरली होती.