कोंकण

दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे पर्यटनाला वीज वितरण चा खोडा !

अपुऱ्या मनुष्य बळाने व्यावसायिक हैराण

सरपंच अमित खोत यांनी केली वीज वितरण कडे मागणी

संदीप लाड

श्रीवर्धन प्रतिनिधी

.दक्षिण काशी हरिहरेश्वर हे जागतिक धार्मिक पर्यटन केंद्र अशी ख्याती आहे.आक्टोबर महिन्यापासून श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला सुरुवात होत आहे.

भाविकांबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक हरिहरेश्वर येथे येत असतात.महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळाचे पर्यटन गृह,हाॅटेल व्यवसाय,घरगुती पर्यटक व्यवस्था या बरोबर हरिहरेश्वर येथे राष्ट्रीय कृत बॅंका,पोस्ट ऑफिस,आयुष्यमान भारत आरोग्य व्यवस्था या सेवांमधून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळास चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त होते.

       हरिहरेश्वर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असले तरी काही वेळेस तत्सम कारणाने वीज खंडित झाल्यास अपुरे वायरमन असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनाकारण काही तासांचा अवधी जातो.या मध्ये जास्त नुकसान होते पर्यटन व्यवसायीकांचे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास हरिहरेश्वर येथील महावितरण कार्यालयात अनेकदा वायरमन नसतातच असलाच तर एखादा.रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास विशेषकरून पर्यटनासाठी आलेल्या महिला व लहान मुलांना अडचणी उद्भवतात.पर्यटन व्यवसाय आता काही दिवसांवर सुरू होत असुन आता हरिहरेश्वर येथील कायमस्वरूपी वायरमन सह एसटी व एलटी लाईन सुस्थितीत राहण्यासाठी वायरमन बरोबर चार मदतनीस चौवीस तास हरिहरेश्वर येथील महावितरण कार्यालयात उपलब्ध असावेत अशी मागणी निवेदना द्वारे हरिहरेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच अमित खोत यांनी श्रीवर्धन येथील उप कार्यकारी अभियंता यांच्या कडे केली आहे.

निवेदना द्वारे केलेली मागणी रास्त आहे.हरिहरेश्वर सेक्शन कडून श्रीवर्धन विभागीय कार्यालयाकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल.

:भुषण तेलंग.

कनिष्ठ अभियंता.हरिहरेश्वर कार्यालय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button