इतर

पत्रकारांच्या हक्कासाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी संवाद यात्रेत सामील व्हा -विश्वासराव आरोटे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे व राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वात राज्यभर दीक्षा भूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा मुंबई कडे आगेकूच करीत असून यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा समारोप येत्या २० ऑगस्ट रोजी मुंबई मंत्रालय येथे होणार असून यावेळी पत्रकार, वृत्तपत्र, जेष्ठ पत्रकार, न्युज पोर्टल, युट्युब चॅनल, वृतपत्र विक्रेता यांच्या रास्त न्यायिक मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या संवाद यात्रेत मोठया संख्येने पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन
पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ, विश्वासराव आरोटे, प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे यांनी केले आहे.पत्रकारांच्या रास्त मागण्याचे निवेदन राज्यातील सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत सरकारला देण्यात येणार असून आपण सर्वांनी दि,२० रोजी मंत्रालय मुंबई येथे उपस्थित रहाणे अत्यंत महत्वाचे असून तेथे आपल्या, मागण्या मंजूर करण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेणार आहोत.
गेली 20 वर्षे हा लढा डॉ, विश्वासराव आरोटे पत्रकारांसाठी देत आहेत म्हणून आपण या लढ्यात सामील होणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन पत्रकार संघाकडून करण्यात येत आहे हा संपूर्ण लढा जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहून आपणच आपल्यासाठी हा लढा यशस्वी करण्याची गरज आहे, पत्रकार बांधवांनो अभि नहीं तो कभी नहीं ही वेळ आता आली आहे
म्हणून दुसऱ्यासाठी नाही
तर स्वतःसाठी या वेळी मात्र आपण मुंबई मंत्रालयात धडक देऊ या
आजवर आपण ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता जनतेसाठी वृत्त संकलन करून खूप वेळ दिलाआहे. पण आता आपल्या हक्कासाठी कुटुंबासाठी वेळ देऊन पुढे येण्याची हीच योग्य वेळ आहे.इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचे प्रश्न एवढ्या प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्यभरात पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकार एकत्र येत आहेत आता हीच ती वेळ आपले हक्क मिळवून घेण्याचीसाठी जागे व्हा, पत्रकारांनो जागे व्हा,,,, चला तर मग फक्त एक दिवस आपल्यासाठी,आपल्या उज्वल भविष्यासाठी २० ऑगस्ट चलो मुंबई,चलो मुंबई हा नारा देऊन एक दिवस स्वतःसाठी द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दीक्षा भूमी ते मंत्रालय अशी ही भव्य दिव्य संवाद यात्रा दि, २०आगस्ट रोजी मुंबई मंत्रालय येथे जाऊन पूर्णविराम घेईल.
या यात्रेत सामील होण्यासाठी आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पत्रकार संघाचे वतीने राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले आहे.


.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button