वैशाली आवारी यांना आदर्श महिला पुरस्कार प्रदान

अहमदनगर दि 3
: गरजू महिलांचे सबलीकरण करतानाच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विनायक जयवंत ताकटे (अण्णा) यांची नात वैशाली संभाजी आवारी यांचा कोल्हापूर येथील जनकल्याण सानाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श महिला पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
वैशाली आवारी यांनी ७० महिलांची भारत भ्रमण घडवून आणली. निराधार, गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय महिलांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी त्या करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून कोल्हापूर येथील जनकल्याण सानाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श महिला पुरस्कार त्यांना संस्थेचे संपत पवार यांच्या हस्ते नुकताच विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, सदाशिव नाळे, राज्य निवेदक बाबासाहेब मेमाणे आदी उपस्थित होते. वैशाली आवारी यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.