कोतुळ येथे सावता महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा

कोतुळ दि17
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे संत सावता महाराज
मंदिरात संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
येथील सावता महाराज मंदिरात ह भ प रामनाथ महाराज जाधव ह भ प नितीन महाराज गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिदिनी हरिनाम संकीर्तन उत्सव सोहळा पार पडला या सोहळ्यात ह भ प रमेश महाराज भोर, गोविंद महाराज करंजकर ,तुकाराम महाराज कदम, सागर महाराज टिपरे ,यांचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी परिसरातील असंख्य भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमात दैनंदिन काकड आरती ,नियमाचे भजन, हरिपाठ कीर्तन ,हरिजागर,असा कार्यक्रम तसेच सावता महाराज मूर्ती अभिषेक, पूजा असे विविध कार्यक्रम व भव्य असा पालखी सोहळा पार पडला

कोतुळ चे सुपुत्र पराग सुरेश सोमण यांची भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्याने व

गणेश रामचंद्र फुलसुंदर यांची नाशिक जिल्हा परिषदेत उपशिक्षण अधिकारी (माध्यमिक) या पदावर निवड झाल्याने तसेच भाऊसाहेब नाना गीते यांना शिक्षण क्षेत्रात तील कामकाजाचे बाबत पीएचडी मिळाल्याने त्यांचा माळी समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला
संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यासाठी उत्सव समिती तसेच सावता महाराज तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले
