जायनावाडी, बिताका गावात स्वच्छता मोहीम.

अकोले/प्रतिनिधी-
जायनावाडी बिताका येथे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” या मोहिमे अंतर्गत “एक तारीख एक घंटा महाश्रमदान” अंतर्गत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.
दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रुप ग्रामपंचायत जायनावाडी बिताका अंतर्गत मौजे बिताका या दुर्गम भागातील गावात स्वच्छता मोहीम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणे , रस्ता व मंदिर आणि सार्वजनिक परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमे अंतर्गत बिताका या गावातील रहिवासी असलेले विधी विभागातील वरिष्ठ अधिकारी ऍडव्होकेट राजाराम बेंडकोळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की , आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांनी , प्रत्येक कुटुंबाने अशीच कायमस्वरूपी स्वच्छता ठेवणे बाबत दक्षता घ्यावी व यामध्ये सातत्य ठेवावे .प्लास्टिक कचरा करू नये.ग्रामसेवक बापूसाहेब राजळे यांनी “स्वच्छता ही सेवा” या मोहिमेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार “एक तारीख एक घंटा महाश्रमदान” या उपक्रमाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वच्छतेबाबत असेच सातत्य कायम ठेवणे बाबत ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात आली. तसेच सरपंच बाळू डगळे यांनी स्वच्छतेबाबत महत्व विषद करून स्वच्छता मोहिमेत सहभागी ग्रामस्थांचे आभार मानले.

याप्रसंगी बिताका गावातील एकल महिला विधवा ,परितकत्या यांचे सर्वेक्षण करण्यात आले व माहिती संकलित करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू डगळे , ग्रामपंचायतीचे सदस्य बाजीराव भांगरे ,पंढरी पेढेकर , ऍडव्होकेट राजाराम बेंडकोळी , ग्रामसेवक बापूसाहेब राजळे ,निवृत्ती पेढेकर ,काळू पेढेकर ,नवनाथ पेढेकर , ह. भ. प. किसन महाराज पेढेकर , मंगेश साबळे ,विठ्ठल पेढेकर ,महिला बचत गटातील मीना पेढेकर ,सोनाली पेढेकर ,मंदा पेढेकर ,गावातील एकल महिला ,तरुण युवक व शालेय विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.

——–