इतर

टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण झावरे तर उपाध्यक्षपदी मोहन रांधवण बिनविरोध !

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण झावरे तर उपाध्यक्षपदी मोहन रांधवण यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण आव्हाड यांनी काम पाहीले तर निखिल जाधव,विजय गायकवाड मदत केली.

टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदासाठी एकमेव नारायण यशवंत झावरे यांना सुचक म्हणून विलास रामदास झावरे तर अनुमोदक म्हणून दौलत मारूती जेजुरकर तर व्हा.चेअरमन पदासाठी सुचक म्हणून मल्हारी गणपत धुमाळ तर अनुमोदक शिवाजी काशिनाथ खिलारी होते.

या निवडणुकीत शिवसेना व भाजप प्रणित जनसेवा पॅनलचे १३ पैकी १० उमेदवार १०० पेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहे.१५ जून रोजी निवडणूक झाली होती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांनी उत्कृष्ठ नियोजन करत निवडूक पार पाडली. निखिल जाधव,विजय गायकवाड

तर आमदार निलेश लंके गटाच्या श्री ढोकेश्वर सहकारी पॅनलला ३ जागा मिळाल्या होत्या.यावेळी शिवाजी काशिनाथ खिलारी, नारायण यशवंत झावरे,विलास रामदास झावरे,मल्हारी गणपत धुमाळ,महेश गोवर्धन पाटील, श्रावण गोपाळा गायकवाड, सुंदराबाई भाऊसाहेब गोरडे,अलकाबाई नानासाहेब बांडे मोहन शंकर रांधवण, दौलत मारुती जेजुरकर हे उपस्थित होते.तर विरोधी गटाचे जयसिंग बबन झावरे,बबन सावळेराम पायमोडे,बबन सोनबा बांडे हे मात्र गैरहजर राहीले.

यावेळी माजी चेअरमन बबनराव पायमोडे, माजी सरपंच सिताराम खिलारी माजी सरपंच संजय उदावंत,पोपट झावरे,शिवाजी खिलारी,किसन धुमाळ,केशव धुमाळ, अक्षय गोरडे,भाऊसाहेब गोरडे.बाबासाहेब झावरे,बापू रांधवण,बबन रांधवण,लक्ष्मण झावरे,रावसाहेब चव्हाण, रघुनाथ थोपटे,मळीभाऊ रांधवण आदी उपस्थित होते.

आमदार निलेश लंके गटाचे तीनही उमेदवार गैरहजर…

आमदार निलेश लंके गटाचे जयसिंग बबन झावरे,बबन सावळेराम पायमोडे,बबन सोनबा बांडे हे चेअरमन व्हा.चेअरमन निवड प्रसंगी गैरहजर राहील्याची चर्चेला उधान आले होते.मात्र जेष्ठ नेते सिताराम खिलारी यांनी तिनही उमेदवार आपलेच असून सेवा संस्थेत त्यांचाही सन्मान राखून हातात हात घालून काम केले जाईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button