इतर
माळीझाप येथे महात्मा गांधी जयंती साजरी
अकोले (प्रतिनिधी)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना स्वच्छता अभियान राबविण्याचा आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत अकोले शहरातील माळीझाप येथे स्वच्छता अभियान राबवत राष्ट्रपित्यास अभिवादन करण्यात आले.
या स्वच्छता अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, एकनाथ मंडलिक, नवनाथ मंडलिक, बाळासाहेब मंडलिक, भारत मंडलिक, निवृत्ती मंडलिक, सीताराम मंडलिक आदिंनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला.