इतर

मुतखेल आश्रमशाळा येथे महात्मा गांधी जयंती साजरी

शिक्षणाने व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंचा सुसंवाद साधला पाहिजे…! आदिनाथ सुतार

विलास तुपे

राजूर प्रतिनिधी

– शिक्षणाने व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंचा सुसंवाद साधला पाहिजे , असा गांधीजींचा आग्रह होता. नैतिक विकास किंवा चारित्र्य विकास हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, असा त्यांचा विश्वास होता. असे विचार श्री.आदिनाथ सुतार यांनी गांधी जयंतीनिमित्त मुतखेल येथे आयोजित कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.


सोमवार दि2.ऑक्टो रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रतनवाडी युनिट-मुतखेल या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा संयुक्त जयंती सोहळा शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार यांच्या अध्यक्षतेखालील आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमात अहिंसा दिना निमित्त ग्रामस्वच्छता, शालेय परिसर व रस्ते स्वच्छता करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश बनसोडे, शंकर जाधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री.सुतार आपल्या प्रमुख भाषणात पुुढे म्हणाले की, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे.
शिक्षणाने मुलांमध्ये मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत. मुलाच्या सर्व लपलेल्या शक्तींचा विकास झाला पाहिजे ज्याचा तो अविभाज्य घटक आहे.शिक्षणाने मुलांचे शरीर, मन, हृदय आणि आत्मा यांचा सुसंवादी विकास साधला पाहिजे.सर्व शिक्षण हे कुठल्यातरी उत्पादक हस्तकलेतून किंवा उद्योगातून दिले जावे आणि त्या उद्योगाशी उपयुक्त संबंध प्रस्थापित व्हावा.

शिक्षणाने व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंचा सुसंवाद साधला पाहिजे, असा गांधीजींचा आग्रह होता. नैतिक विकास किंवा चारित्र्य विकास हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, असा त्यांचा विश्वास होता. गांधीजी स्वतः लिहितात.

“स्वत:चा विकास करणे म्हणजे चारित्र्य घडविणे होय. मुलाला व्यावहारिक कामासाठी तयार करणे, प्रयोग करणे आणि संशोधन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून तो शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक रीत्या विकसित होऊन समाजाचा एक उपयुक्त सदस्य बनू शकेल. मातृभाषा, मूलभूत हस्तकला, ​​अंकगणित, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, कला, संगीत आणि इतर विषयांचा समावेश केला.


गांधीजींनी प्राथमिक शिक्षणाच्या योजनेत “स्वच्छता, पोषण ही प्राथमिक तत्त्वे” याशिवाय “संगीताच्या कवायतीद्वारे अनिवार्य शारीरिक प्रशिक्षण” समाविष्ट असेल. विद्यार्थ्यांना मजबूत, आत्मविश्वास आणि त्यांच्या पालकांना आणि त्यांच्यासाठी उपयुक्त बनवेल.
असी गांधीजींची शैक्षणिक भूमिका या विषयीच्या भाषणात श्री. सुतार यांंनी शेवटी सांगितले.


कार्यक्रमात पंकज दुर्गुडे ,मंंगल साळवे, अविनाश बनसोडे, जगदीश बेळगे, मंगला काकडे,ज्योती सातपे, बाबासाहेब लोंढे,जनार्दन मगर व इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उदबोधित केले.कार्यक्रमात विविध मुुला-मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बाबासाहेब लोंढे यांनी केले तर आभार श्री.जनार्धन मगर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button