अहंमदनगर ,बीड,संभाजीनगर या जिल्ह्यातील घरफोडी व जबरी चोरीतील आरोपी केला गजाआड!

सोमनाथ म्हातारदेव घुले राहनार शेकटे, ता. पाथर्डी हे दिनांक 27/09/23 रोजी घरा बाहेर गेलेले होते त्यामुळे अनोळख्या
आरोपींनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन 70,000/- रुपये किंमतीचे मनी मंगळसुत्र व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार घरफोडीची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा तपास लावण्यासंबंधीचे आदेश दिले त्यानुसार
स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेवुन तपास व कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथक चिचोंडी पाटील, ता. नगर परिसरात रेकॉर्डवरी ल आरोपींची माहिती घेत असताना काही संशयीत इसम पोलीस
पथकास पाहुन पळु लागले पथकाने संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख
सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) रोहित नादर चव्हाण वय 21, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर व 2विधीसंघर्षीत बालक असे सांगितले.
त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली त्या बाबत विचारपुस करता आरोपी रोहित चव्हाण याने अल्पवयीन साथीदारासह शेकटे, पाथर्डी व सावेडी नाका, अहमदनगर येथे बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींनी दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने पथकाने जिल्हा गुन्हेअभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 2 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्या बाबतची माहिती प्राप्त झाली.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु. र. नं. व कलम
- पाथर्डी 1006/23 भादविक 454, 380
- तोफखाना 1429/23 भादविक 454, 380 आरोपींनी दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने वरील प्रमाणे 2 गुन्हे उघडकिस आले असुन आरोपींचे कब्जातुन 1,00,000/- रुपये
किंमतीचे 2 तोळे वजनाचे मनीमंगळसुत्र व 10,500 /- रुपये रोख असा एकुण 1,10,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्यानेआरोपी व त्यांचे 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेवुन तोफखानापोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना
पो.स्टे. करीत आहे.
आरोपी रोहित नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या
विरुध्द अहमदनगर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुनाचा
प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण-7 गुन्हे दाखल आहेत.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मैडम श्रीरामपूर विभाग व उपविभागीय
पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, संगमनेर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.