पारनेर प्रतिनिधी:- तालुक्यातील गुणोरे गावातील गाडिलगाव रस्त्यावर बाळू रामदास गोपाळे यांच्या शेतात १२ लाख ४५ हजार रुपयांची ६८ गांजाची झाडे जप्त केली असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली आहे.पारनेर पोलिसांच्या छाप्यामध्ये १२ लाख ४५ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे वजन २४९.२३० किलोग्रॅम ६८ लहान मोठी हस्तगत करण्यात आली आहे. पारनेर पोलिसांची या अवैध गांजा विरोधात बुधवारी दुपारी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी- बाळू रामदास गोपाळे (वय ३० वर्ष, राहणार गुणोरे, कारखिले मळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी १२ जुलै रोजी ही कारवाई पारनेर पोलिसांनी केली आहे. आरोपीचे शेती गट नंबर ३१ मध्ये गुणोरे शिवारात ही गांजाची शेती आढळून आली असून नायब तहसीलदार गणेश आढारी, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस उनिरीक्षक हनुमंत उगले, फौजदार शिवाजी कडूस, पोलीस हवालदार डहाळे, पोलीस नाईक सुधीर खाडे, पोलीस नाईक गहीनाथ यादव, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी, सागर धुमाळ, मयूर तोरडमल, सुरज कदम, सारंग वाघ, अमित कडूस, पोलीस कॉन्स्टेबल चालक शेळके यांनी ही कारवाई केली आहे. पारनेर पोलिसांच्या छाप्यामध्ये मिळालेला मुद्देमाल १२ लाख ४५ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे वजन २४९.२३० किलोग्रॅम ६८ लहान मोठी झाडे यामध्ये आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई यशस्वीरित्या करण्यात आली.