ग्रामीण

भायगाव येथील शेतकऱ्यांचा अंत्रे सबस्टेशन वर ठिय्या आंदोलन


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील शेतकऱ्यांना शेती पंपाच्या वीज पुरवठा संदर्भात गेल्या एक महिन्यापासून विजेच्या लपंडाव चा सामना करावा लागत आहे.

याबाबत स्थानिक शेतकरी व गावच्या प्रमुखांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वी वेळोवेळी तोंडी माहिती दिली आहे. मात्र परिसरातील फक्त भायगाव येथीलच शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज व अक्षय प्रकाशच्या विजेसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

रात्री आजूबाजूच्या सर्वच गावांना वीज पुरवठा सुरळीत आहे. मात्र भायगावलाच वीज नाही या संताप जनक भावनेतून गावातील शेतकरी व भायगावचे सरपंच यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी आंत्रे (शहरटाकळी ) येथील सबस्टेशन मधील आवारात रात्री अकरा वाजता ठिय्या आंदोलन केले.

यावेळी अधिकारी व शेतकरी यांच्या चर्चा होऊन उद्याच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल. असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

तात्पुरत्या स्वरूपात एक तास पिण्याच्या पाण्यासाठी शेती पंपाचावीज पुरवठा सुरळीत केला जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.

यावेळी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, माजी उपसरपंच विजय खेडकर, शिवाजी लांडे, रामहरी ढोरकुले, गोरक्षनाथ शेळके, अनिल लांडे, संभाजी कडूस, महादेव दुकळे, रामेश्वर उभेदळ, सचिन आढाव, नवनाथ लोखंडे, किसन आढाव, प्रदीप लांडे, नारायण आढाव, अभिजीत आढाव, अमोल आढाव महेश आढाव, बाळासाहेब लांडे,श्रीराम (पप्पू ) आढाव, हर्षल नेव्हल,भारत खंडागळे, पांडुरंग उभेदळ, अरुण नजन, डॉ. परवेज सय्यद,कैलास नजन, प्रदिप नजन, सुनिल नजन, एकनाथ गलांडे, दत्तु नजन, सचिन नजन, तुषार नजन, अक्षय नजन, सोमा नजन, आशिष नजन, चांगदेव नजन, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आंत्रे सबस्टेशन मधील सर्किट ब्रेकर ( CB) खराब असल्यामुळे भायगावला वीज पुरवठा खंडित होत होता. आजच आपण नवीन ब्रेकर बसवला आहे. त्यामुळे यापुढील काळात भायगाव येथील शेतकऱ्यांना ठरलेल्या वेळेमध्ये वीज पुरवठा सुरळीत राहिल.
उद्धव पुरी
प्रिन्सिपल ऑपरेटर आंत्रे सबस्टेशन


आंत्रे सबस्टेशन मधून भायगाव शेतीपंप व भायगाव गावठाणसाठी वीज पुरवठा सुरळीत करावा या शेतकऱ्यांच्या मागणीला अधिकारी वर्गातून समाधानकारक उत्तर मिळाले व त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत झाला. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. यापुढील काळात सुरळीत वीज पुरवठा मिळेल अशी अपेक्षा आहे.


राजेंद्र आढाव पाटील
सरपंच ग्रामपंचायत भायगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button