माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना युनिव्हर्सिटी ऑफ् सेन्ट्रल अमेरिका ची डी . लिट् . पदवी जाहीर

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी –
दि युनिव्हर्सिटी ऑफ् सेन्ट्रल अमेरिका ची डी . लिट् , अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त,माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना नुकतीच जाहीर करण्यात आली
,त्यांच्या सामाजिक एकता तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण व विशेष अशा योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ् लेटर्स ( डी . लिट् ) ही गौरवशाली पदवी जाहीर झाली आहे .नुकतीच सदर पदवी ही इ-मेल द्वारे प्राप्त झाली आहे.
या पूर्वी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने ‘बीर बिरसा मुंडा पुरस्काराने,’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराने मधुकरराव पिचड यांना सन्मानित करण्यात आलेले होते.
शैक्षणिक क्षेत्रातील डी . लिट् . ने झालेला हा सन्मान म्हणजे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या आजवरच्या ग्रामीण – आदिवासी भागातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाची दखल असून यामुळे तालुक्याची मान देशभर उंचावली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त, माजी आमदार वैभवराव पिचड , आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, राजूर चे उपसरपंच संतोष बनसोडे, माजी सरपंच गणपतराव देशमुख,गोकुळ कानकाटे शेखर वालझडे अविनाश बनसोडे दौलत देशमुख, विजय लहांमगे , पत्रकार प्रकाश महाले,विलास तुपे शांताराम काळे,विनायक घाटकर आदी सह सर्व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी माजी मंत्री पिचड यांचे अभिनंदन केले आहे.