विद्यार्थ्यांमध्ये रमणे आधिक पसंत केलं -शेषेराव दाहिफळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
खडू व फळा हे माध्यम वापरूनच ज्ञानदानाचे काम केलं. वेळेच्या बाबतीत कधी तडजोड केली नाही. याचा मला वैयक्तीक त्रास झाला मात्र मी माझे तत्व सोडले नाही.आजही मला विद्यार्थ्यां मध्ये राहायला आवडते. म्हणुन मी त्यांच्यात रमून जातो. असे भावनिक उदगार शहरटाकळी विदयालयाचे माजी शिक्षक शेषेराव दहिफळे यांनी काढले.
शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे शहटाकळी हायस्कुल शहरटाकळी या विद्यालयाची दहावीची १९९१ची बँचच्या स्नेहबंध या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्याथ्याचा मेळावा , देवटाकळी येथील शिवाजी तागड यांच्या शेतामध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. कोणतेही काम जीव ओतून करा तुम्हाला यश प्राप्ती निश्चित मिळेल. प्रामाणिकपणा मनापासुन जोपासावा तुम्हा विद्याथ्यामध्ये आजही वेळ देताना मला मनस्वी आनंदच होतो. असे मत त्यांनी मांडले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्प आर्पण करून उपस्थित गुरुचे पुजन करण्यात आले. यावेळी भगवान आरगडे, तुकाराम म्हस्के, गोरक्षनाथ भिसे, आण्णासाहेब सोनवणे, उत्तम निकाळजे, शेषेराव दहिफळे यांची भाषणे झाली.आनेक विदयाथ्यानी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे शिवाजी आडकित्ते, राजेश लोढे, सुभाष बरबडे, आरूण आपशेटे,नामदेव लोढे, माऊली निमसे, गंगा गवळी, महावीर गांधी, मोहन कोल्हे, योसेफ दळवी, ज्ञानदेव आजबे, अरूण शेटे, दिनेश सोनवणे, गहिनीनाथ लाड, संभाजी भुसे, चंगेडिया श्रीपाल, वसंत कावले, लक्ष्मण साठे, तुकाराम लोढे, कल्याण सुरशे, शिवाजी भुसे, गोंविद इंगळे, बाबा पानकर, पत्रकार रविंद्र मडके, शहाराम आगळे यांच्यासह माजी विदयार्थी उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शब्दगंध साहित्य परिषदेचे राजेश लोढे यांनी केले तर माऊली निमसे यांनी आभार मानले.
आई वडीलांना विसरू नका –
जीवनात कोणताही व्यवसाय करा, नोकरी करा, फक्त आई वडीलांना विसरू नका. असा मौलिक सल्ला विदयालयाचे माजी शिक्षक तुकाराम म्हस्के यांनी दिला. अदमदनगर जिल्हयामध्ये आबासाहेब काकडे हि शैक्षणिक संस्था उत्कृष्ट संस्था म्हणुन नावलौकिक मिळवत आहे. त्यामध्ये अॅड शिवाजीराव काकडे व हर्षदाताई काकडे याचा सिंहाचा वाटा आहे. असे गौरव उद् गार काढले. संस्थेचे आनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करताना पहिल्यावर आमाची मान उंचावते.समाजामध्ये काम जीवन जगताना आई वडिलांना तीर्थ समजुनच त्यांची पुजा करा जिवनात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.
ह.भ.प. तुकाराम म्हस्के
माजी शिक्षक शहरटाकळी विद्यालय