नामदेव बारामते सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न जि.प.कोहंडी शाळा

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
जि.प.शाळा कोहंडी येथे नामदेव बारामते पत्नी,सौ.नंदा बारामते यांचा सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला
मुक्ताआई मंदीरापासून ते शाळेपर्यंत बैलगाडीत बसून ढोल,ताशा,सनई व अंबित येथील आदिवासी कांबडावण नृत्य जि.प.शाळा टिटवी मुलीचे लेझीम पथक गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली
त्यानंतर तालूक्याचे आमदार मा.डॅा. किरण लहामटे साहेब यांनी सरांचे शाल, श्रीफळ,गुलाबपुष्ष देऊन सत्कार करून आपले सरांन विषयी मनोगत व्यक्त केले. शाळेजवळ मुलीनी औक्षण ताट घेऊन ओवाऴिले वफुले टाकीत स्टेजजवळ नेले.
सुरूवातीला प्रस्ताविक श्री.बो-हाडे सर यांनी करून अध्यक्ष निवड श्री. विठ्ठल बांडे सर यांनी करून,अनुमोदन श्रीमती.लता धादवड मॅडम यांनी केले.
त्यानंतर अध्यक्ष स्थान .श्री.मनोहर गवारी(बाबा),गावच्या सरपंच सौ.हिराबाई तातळे (मॅडम)श्री.गभाले सर,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.गोरख परते,सामाजिक कार्यकर्ते श्री.सखाराम सारोवते,व स्टेजवर(मंचावर)सत्कार मृर्ती विराजमान झाले.
त्यानंतरसूत्र संचालन श्री. गणपत चौधरी सर मान्यवरांचे सत्कार करण्यात येवून मा.उपसभापती श्री.मारूती मेंगाळ साहेब यांनी सरांचा सत्कार करून सरांच्या कार्क्रमाची गर्दी पाहून लग्नाची आहे कि सेवापुर्तीची आहे असे गौरव उद्दगार काढले.
त्यानंतर श्री.ज्ञानेश्वर डगळे(सर)यांनी स्वरचित सरांच्या जीवनावर आधारित कविता छान लिहून उत्तम गायली.त्यानंतर मा.. माजी गटशिक्षणअधिकारी श्री.अरविंद याकुमावत साहेब,व केंद्रप्रमुख श्री.बाळासाहेब जाधव साहेब यांनी सरांचा सत्कार करून मनोगत व्यक्त केले ,केेंद्रास मदत म्हणून सरांनी 5000रू.चेक साहेबाजवळ स्फूर्त केले,त्याऩंतर सरांकडून मुलांसाठी स्कूल बॅग ज़ि.प.शाळा कोहंडी व टिटवी साहेबांच्या हस्ते देण्यात आली

सरांचा मुलगा कृषी अधिकारीश्री.प्रदिप बारामते(साहेब)यांनी आपल्यावडिलाविषयीबहूमोल मनोगत व्यक्त करून मी कसा अधिकारीझालो हे त्यांनी सांगितले.त्यानंतर सत्कारमृर्ती श्री.बारामते सर यांचे मनाेगत होऊन सरांचे .पाहूणे व नातेवाईक यांनी सत्कार केले .उपस्थित शाळा व्यवस्थापन सम़िती अध्यक्ष श्री.आत्माराम तातळे,उपाध्याक्षा सौ.देठे मॅडम व सदस्य तसेच शिक्षक उपस्थितीत श्री.मूरलीधर बारामते ,श्री.मयूर बारामते, व़िष्णू बारामते दिपक बो-हाडे सर,श्री,घोरपडे सर,श्री.लालू भांगरे सर ,श्री.प्रल्हाद कोंडार सर,श्री.पंढरीनाथ चौधरी सर,श्री. गणेश मैंड सर,व श्रीमती.अशा जाधव मॅडम,ज़िल्हाप्रतिनिधी राजेंद्र निमसे पो. पा . मधुकर देठे बाळासाहेब कदम संघटनेचेअध्यक्ष व सदस्य तसेच गावचेप्रमुख कार्यकर्ते श्री.पांडूरंग तातळे , पूनाजी धोंगडे ग्रामपंचायतीचे आजी,माझी सदस्य उपस्थित होते.
शेवटी आभार प्रदर्शन श्री.विकास कडाळी सर यांनी आभार मानले