इतर

डाॕ.डी.वाय. पाटील महाविद्यालयात पार पडली ‘अविष्कार’ स्पर्धा.


आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी येथे महाविद्यालयस्तरावर अविष्कार स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद् घाटन डाॕ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे कार्यकारी संचालक, डाॕ. अविनाश ठाकूर यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शक परिक्षक म्हणून डाॕ. रामदास गंभीर, डाॕ. मिलिंद सरदेसाई, डाॕ. संजय कप्तान, डाॕ. एस. डी. आघाव, डाॕ. किशोर निकम हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डाॕ. ठाकूर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाला एक व्यासपीठ मिळाले. तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा चालना देण्यासाठी संस्था सर्वोतपरी प्रयत्न करत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अविष्कार ही स्पर्धा सुरू करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आजपर्यंतची या स्पर्धेची वाटचाल सांगितली. ते अविष्कारचे चेरमन असताना त्यांनी केलेले अमूलाग्र बदल त्यांनी सांगितले. तसेच या पुढे महाविद्यालयामाध्यमातून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या संशोधनावर भर दिला जाईल असे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत ढेसले यांनी केले तर आभार डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.या स्पर्धेत सर्व शाखांमधून ८० विद्यार्थ्यांनी आपले ४९ संशोधन प्रोजेक्ट सादर केले. त्यातील परीक्षकांनी २९ प्रोजेक्टची निवड जिल्हास्तर/ विभागस्तर स्पर्धेसाठी केली.
२००६ साली सुरू झालेली ‘अविष्कार’ ही स्पर्धा, महाविद्यालयीनस्तर, विभागस्तर/जिल्हास्तर, विद्यापीठस्तर, राज्यस्तर अशा अनेक टप्यात ही दरवर्षी स्पर्धा पार पडते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधकदृष्टी वाढीस लागण्यासाठी व त्यांनी केलेले संशोधनाला एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यादृष्टीकोनातून तत्कालीन राज्यापाल यांच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही स्पर्धा सुरू केली होती.
या कार्यक्रमाचे आयोजन डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष डाॕ. पी.डी.पाटील साहेब, उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डाॕ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. चेतन सरवदे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button