अहमदनगर
संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंगेश सालपे यांची निवड!

उपाध्यक्षपदी अमोल मतकर,
सचिवपदी शेखर पानसरे तर कोषाध्यक्षपदी संजयअहिरे
संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर शहरातील बहुतांश पत्रकारांचा समावेश असलेल्या संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी दै.नगर सह्याद्रीचे मंगेश सालपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शनिवार (दि.२७) रोजी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी वर्षभरासाठी या निवडी करण्यात आल्या.
यावेळी संघाच्या उपाध्यक्षपदी दै.प्रभातचे अमोल मतकर, सचिवपदासाठी दै.लोकमतचे उपसंपादक शेखर पानसरे तर कोषाध्यक्षपदी दै.युवावार्ताचे उपसंपादक संजय अहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघाने आजवर पत्रकारांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवत सामाजिक काम केले आहे तीच पंरपरा कायम ठेवत याही पुढे ही सामाजिक काम पुढे नेण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांनी दिली.
विविध वृत्तपत्र तसेच प्रसिद्धी माध्यमांसाठी काम करणार्या संगमनेरातील सक्रिय पत्रकारांचे सर्वात मोठे संघटन असलेल्या श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष आणि एबीपी माझाचे उत्तर नगर जिल्हा प्रतिनिधी नितीन ओझा यांनी गेल्या वर्षभरातील कामाकाजाचा आढावा सांगितला. वर्षभरात संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचा उल्लेख केला.
मावळते उपाध्यक्ष सतीश आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त करत वर्षभरातील झालेले कामकाज सांगितले. त्याच सोबत मावळते सचिव आणि सायं.दै.आनंदचे उपसंपादक सुनील महाले यांनी वर्षभर सर्व पत्रकारांसोबत संवाद सुरु ठेवून संबंध सांभाळल्याचे सांगितले. त्यास सोबत मावळत्या कोषाध्यक्षा आणि एकमेव महिला पत्रकार असलेल्या दै.केसरीच्या नीलिमा घाडगे यांनी आपल्या कोषाध्यक्ष पदाच्या कार्यकाळ उनगडून सांगितला.
नूतन अध्यक्ष मंगेश सालपे यांनी प्रामाणिकपणे पत्रकारांसाठी सतत काहीतरी काम करणाऱ्या या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणं गौरवास्पद असल्याचे सांगितले. या संघटनेचे नाव आज पर्यंतच्या सर्व पदाधिकारी यांनी टिकवून ठेवले आहे आणि या पुढे देखील आम्ही नवीन पदाधिकारी या संघटनेला कोणतेही गालबोट न लावू देता प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या सर्वसाधारण सभेला नूतन व मावळत्या पदाधिकार्यांसह श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने,आनंद गायकवाड, सचिन जंत्रे, सोमनाथ काळे, अंकुश बुब, धिरज ठाकूर, काशिनाथ गोसावी, संदीप वाकचौरे, भारत रेघाटे, नीलिमा घाडगे, बाबासाहेब कडू, सुशांत पावसे आदी पत्रकार उपस्थित होते.
आज पर्यंतच्या पदाधिकारी यांनी संघटनेचे काम प्रामाणिक पणे केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवत सर्व सदस्यांना विश्वासात घेवूनच संघटनेचे काम करणार आहे. मी जरी सध्या अध्यक्ष पदावर असलो तरी आधी संघटनेचा सदस्य आहे त्यामुळे काही चुकले तर आपण हक्काने सांगावे.
मंगेश सालपे
अध्यक्ष संगमनेर श्रमिक पत्रकार संघ