पायी ” दिंडी ” तील नामस्मरणा मुळे पापाची निवृत्ती होते-ह.भ.प. अरुण महाराज शिर्के

विलास तुपे
राजूर -पायी ” दिंडी ” तील नामस्मरणा मुळे पापाची निवृत्ती होते, काम व क्रोध यांचे दमन होते. जीवनात पंढरपूर ची वारी करावी असे मत ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.
संत आले वरले दिंडी |
हाती खुरक्या काखेत मुंडी ||
या शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या कुट नावच्या प्रकरणातील दिंडी चे महत्व सांगून संतांची शक्ती सांगणारा अभंगावर निरूपण करताना शिर्के महाराज बोलत होते. अकोले तालुक्यातील मवेशी येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थान धन्वंतरी आयुर्वेदाचार्य महामंडलेश्वर बाळानंद महाराज कोंडार यांचे आश्रमात गुरुवार महाआरती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिर्के महाराज म्हणाले की, कोंडार महाराज यांचे धार्मिक, आयुर्वेदिक कार्य दैदिप्यनमान आहे. आयुर्वेद ही आपले देशाची प्राचीन संस्कृती असून रोगाचे संपूर्ण उच्चाटण केले जाते अन त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत नाही. शक्ती असून दाखवणारे देव, शक्ती नसून दाखवणारा जीव, शक्ती असून न दाखवणारे संत असतात. टाळ मृदूंगाच्या गरजात नाद ब्रम्ह प्रगट होते.
यावेळी ह.भ.प. सोमनाथ महाराज भोर, मुकुंद महाराज बोऱ्हाडे, संदीप महाराज सावंत, अविनाश महाराज वांडेकर, तेजस महाराज खोंड,राजाराम राऊत, कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवक मराठा महासंघ जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, विठ्ठल महाराज राऊत, कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्थेचे विध्यार्थी उपस्थित होते.