जीवन जगत असताना धनाचा संचय महत्त्वाचा -आदिनाथ महाराज शास्त्री

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
धनसंचयन करताना योग्य वेळ ही महत्त्वाची असते. त्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे, संतानीही या गोष्टीचा उपदेश करताना संपूर्ण मानव जातीला धन संचयाचे महत्त्व धर्म ग्रंथामध्ये सांगितले आहे. आपले जीवन जगत असताना आपले क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये अर्थ प्राप्तीला फार महत्त्व आहे. त्यासाठी त्याचे संचयन करणे गरजेचे आहे. असे मत तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी मांडले.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे तिसगाव अर्बन मल्टीस्टेट या संस्थेच्या सहाव्या शाखा उद्घाटन प्रसंगी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री बोलत होते.
यावेळी विचार मंचावर श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, देवगड संस्थानचे सेवेकरी ह. भ. प. कल्याण महाराज पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर यांचे स्वीय सहाय्यक शरद मरकड प्रगतशील शेतकरी रामदास बडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराजांनी जीवन जगत असताना अर्थ प्राप्ती महत्त्वाची आहे. त्याचा संचय हा वेळीच केला तर भविष्यातील अनेक अडचणी पासून आपण वाचवू शकतो. त्यासाठीच अशा संस्था समाज उपयोगी ठरत आहेत. असे मत त्यांनी मांडले.
यावेळी महंत सुनिलगिरी महाराज, कल्याण महाराज पवार, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, एकनाथ काळे, भातकुडगावचे सरपंच अशोक वाघमोडे, पाराजी नजन, विठोबा वाघमोडे, चंदु फटांगरे, रामदास बडे, एकनाथ फटांगरे, रमेश कळमकर,भाऊजी कासार,बबन बडे, सुनिल भवार,भाऊ गाडगे, डॉ जायभाये,अशोक ढाकणे, रामदास ढाकणे,पांडुरंग बडे, कार्यक्रमाचे प्रस्ताविक तिसगाव अर्बनचे मल्टीस्टेटचे चेअरमन सुनिल शिरसाठ यांनी केले.तर भाऊसाहेब शेलार यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
तिसगाव अर्बन मल्टीस्टेटच्या सहाव्या शाखेचे भातकुडगाव येथे संत -मंहतांच्या व भातकुडगाव सह परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन समारंभ पार पडला.ग्रामीण भागातील व्यवसायिकासह शेतकऱ्यांनाही या बँकेचा निश्चित फायदा होईल. तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सुविधा या बँकेच्या मार्फत गावातच उपलब्ध होणार असल्याने लोकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.रामदास बडे
प्रगतशील शेतकरी भातकुडगाव