इतर
श्रमिक बालाजी देवस्थानच्या वतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह

नगर-सावेडीतील श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३० व्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री व्यकंटेश्वर कल्याणम सोहळा शनिवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न होणार आहे.त्याच सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे,दिवसेंदिवस विवाह सोहळयाकरीता लागणारा खर्चही वाढत आहे.यामुळे गोरगरीबांना विवाह समारंभ करणे परवडत नाही. गोरगरीब व सर्व जाती बांधवाचे हित हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ट्रस्ट हा उपक्रम गेली ११ वर्षे दरवर्षी सातत्याने करण्यात येत आहे आहे.
आतापर्यंत १९० विवाह या माध्यमातून झाले आहेत.यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्याला संसार उपयोगी साहित्य,मुलीला शालू,मुलाला कपडे,मणी मंगळसूत्र लोकसहभागातून देण्यात येते.या विवाह सोहळयाचा लाभ हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू वरांना सहभाग घेता येईल. त्यासाठी इच्छुकांनी विवाहासाठी लागणा-या कागदपत्रांसह आपली नावे रविवार दि १३ ऑगस्टपर्यंत श्रमिक बालाजी मंदिरात सायं ६ ते ९ या वेळेत नोंदवावीत यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला,आधार कार्ड झेरॉक्स तसेच मुलाचे वय २१ वर्षे व मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण आवश्यक,जर अांतरजातीय विवाह असेल तर आई-वडीलांची संमती पत्रक असणे आवश्यक,मुलाचे व मुलीचे पासपोर्ट साईज फोटो प्रत्येकी दोन, रेशन कार्ड, आधार कार्ड व फोटो असलेले ओळखपत्र झेरॉक्स प्रत,१०० रुपयाचे स्टॅम्प पेपर मुलाच्या वडीलांच्या नावाने व हस्ते मुलीच्या वडीलांच्या नावाने असणे आवश्यक,प्रत्येकी २ साक्षीदार त्याची नावे संस्थेची सव्वा रुपयाची पावती करणे आवश्यक.वरील सर्व कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
सोहळयाचा उपक्रम संस्थेच्या वतीने श्री श्रमिक बालाजी मंदिरात करण्यात येईल.या सामुदायिक विवाहात जास्तीत जास्त वधू वरांनी सहभाग घ्यावा. इच्छुकांनी आपली नावे बालाजी मंदिरात नोंदवावीत असे आवाहन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था(ट्रस्ट)वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी विनोद म्याना मो ९८५०६७७७७४,नारायण यन्त्रम मो.९४२०८०२०१०,किसनराव बोमादंडी मो.९९७५३९४४६० ,अंबादास महेसुनी मो.९६५७६१०९१२,ज्ञानेश्वर सुंकी मो.९८९०८७४९४८,गणेश येमुल मो.९४२३७५०७४८ यावर संपर्क साधावा.