पारनेर शहराला निधी कमी पडू देणार नाही !आ.निलेश लंके

आ.लंके यांच्या हस्ते पारनेर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न !
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी :
पारनेर शहरात अनेक वर्षापासून प्रलंबित असणार्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पाडला .
या मध्ये चंद्रकांत गायकवाड ते आंबेडकर चौक भुयारी गटार करणे रू.३,६६,५५०/,काकडे सर ते जुनी पंचायत समिती परिसर पेव्हिंग ब्लॉक बसविणे ४,५५,४७९,शेळके सर ते लोणी रोड भुयारी गटार करणे रू.३,६६,५५०/,सार्वजनिक खंडोबा मंदिर, भैरवनाथ गल्ली पेव्हिंग ब्लॉक बसविणे
३,५०,००० / – ,कोल्हे वकील ते लोणी रोड भुयारी गटार करणे रू.३,६६,५५०/,कासार सतिष ते लोणी रोड भुयारी गटार करणे रू.३,६६,५५०/, नरेश साळवे ते लोणी रोड भुयारी गटार करणे रू.३,६६,५५०/ शब्बीर शेख ते वरची वेस भुयारी गटार करने रू.७,४४,६९८/ अब्बास अत्तार ते सुलाबाई शेलार यांचे घरापर्यंत .रस्ता काँक्रिटीकरण करणे रू.२,०८,७९८ ,जामगाव रस्ता ते औटी वाडा रस्ता काँक्रिटीकरण करणे रू.८,३३,४३१/ रेपाळे सर रस्ता ते बर्वे सर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे रू.११,४९,८६२/,बुगेवाडी येथील शाळा खोल्या १७,५०,०००/- या कामांचा शुभारंभ व लोकार्पन सोहळा आ. लंके यांच्या हस्ते पार पडला .
पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री.विजय सदाशिव औटी , उपनगराध्यक्षा सौ.सुरेखाताई अर्जुन भालेकरसभापती : श्री.योगेश अशोक मते,सौ.विद्या बाळासाहेब कावरे ,श्री.नितीन रमेश अडसूळ ,सौ.प्रियंका सचिन औटी , नगरसेवक
श्री.अशोक फुलाजी चेडे ,सौ.नीता विजय औटी ,सौ.सुप्रिया सुभाष शिंदे ,श्री.भूषण उत्तम शेलार , हिमानी रामजी ( बाळासाहेब )नगरे श्री.श्रीकांत किसन चौरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर ,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे माजी सभापती गंगारामशेठ बेलकर,रा.या.औटी , संजय वाघमारे , बाळासाहेब मते , बाळासाहेब नगरे, बबन चौरे , विजय डोळ , डॉ. सचिन औटी,विजय भा.औटी , सुभाष शिंदे , आनंदा औटी , सादीक राजे , शहराध्यक्ष बंडू गायकवाड , उमाताई बोरुडे , वैजंयता मते , नानी बोरुडे , दिपाली औटी , सचिन नगरे , बाबा पठारे , अॅड. मंगेश औटी , सचिन पठारे , आशोक कावरे , नगर पंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या सह पारनेर शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
या वेळी पारनेर शहरवासियांकडून हार तुरेला फाटा देवून आ. लंके यांचा नागरी सत्कार शालेय साहीत्य देवून करण्यात आला.व प्रभाग क्र .१० च्या नागरीकांकडुनही शालेय साहीत्य देवून आ.लंके यांना सन्मानित करण्यात आले.
पारनेरचे ग्रामदेवत आसनाऱ्या भैरवनाथाच्या मंदीरात पार पडलेल्या सभेत बोलताना आ.लंके यांनी नागरीकांसोबत दिलखुलास चर्चा करताना म्हटले की , सरकार कुठलेही आसुद्या परंतु पारनेर शहराला मी निधी कमी पडू देणार नाही .अनेक वर्षापासून पारनेर शहराचे एक अनोखे रूप माझ्या नजरेसमोर आहे व मी ध्येयवादी माणूस असल्याकारणाने पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन . शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक , पारनेर शहरात एक सुसज्ज उद्यान , भव्य क्रीडांगण , व्यापारी संकुल , पारनेर बाजारपेठ , पारनेर शहराला जोडणारी मुख्य रस्ते यांचे सुशोभीकरण व पारनेरचा पायाभूत विकास आराखडा तयार करण्यासाठी मी जातीने लक्ष घालणार असून पारनेरचा पाणी प्रश्न हा मीच सोडवणार असे शाश्वत आश्वासन आमदार लंके यांनी यावेळी दिले .
पारनेर शहरातील विविध नागरी सुविधा राजकीय सूडबुद्धी राजकारणामुळे दुर्लक्षित झाल्या आहेत . पारनेर नगरपंचायत मध्ये नगरसेवकांना विरोधक कसे अडचणी निर्माण करू राहिलेत याचा आढावा अर्जुनशेठ भालेकर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.कावरे यांनी केले या वेळी गंगारामशेठ बेलकर , रा.या.औटी गुरुजी , पत्रकार संजय वाघमारे , आशोकशेठ चेडे , बबन चौरे , भुषण शेलार , हिमानी नगरे यांनी आपल्या भाषनातुन सौर्वभौम पारनेर शहरातील विकास व शहरातील अडचणी व समस्या आपल्या भाषणातुन मांडल्या
.कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय औटी यांनी आपल्या भाषणात विविध सामाजिक व राजकीय प्रश्नावर जनतेशी संवाद साधला .विजय डोळ यांनी सूत्रसंचालन केले तर सभापती योगेश मते यांनी सर्वांचे आभार मानले .