इतर

ग्रामसेवकास मारहाण करणा-या इसमास तीन महिने सश्रम कारावास ,२० हजार रुपये दंडाची शिक्षा

अकोले प्रतिनिधी

ग्रामसेवकास दमदाटी करून मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने तीन महिने सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली

अकोले तालुक्यतील करंडी गावच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक सोमा मुरलीघर येडे व पाणी पुरवठा कर्मचारी शशीकांत गोदके ग्रामपंचायत शिपाई विठठल जानकु गोंदके रोजगार सेवक सोमनाथ वामन वायाळ हे सर्व दैनंदिन काम करत होते रोजगार हमी योजनेची शिवार फेरी सर्वे करणे असल्याने कृषी सहाय्यक अनिल फापाळे यांचे सोबत गावात जायचे होते तेव्हा करंडी गावात दत्तात्रय विठठल गोंदके हा ग्रामपंचायत कार्यालयात आला व एक अर्ज देउ लागला असता तेव्हा फिर्यादी ग्रामसेवक त्यास म्हणाले सर्वे करण्यासाठी जाउन आल्यावर तुमचे माहीती देतो तेव्हा आरोपी म्हणाला की आत्ताच्या आत्ता माहीती दया नाहीतर तुम्हाला बाहेर जाउ देणार नाही परंतु त्यास समजावून सांगून देखिल त्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती व मी ग्रामपंचायत बाहेर जावू नये म्हणून त्याने पटकन बाहेर जावून दरवाजा लावून घेत फिर्यादी सोमा येडे
यांना आत मध्ये कोंडून घेतले २ तासानंतर दरवाजा उघडला असता फिर्यादी ग्रामपंचायत बाहेर जावू लागला
असता आरोपीने फिर्यादीचे छातीत जोरात लाथ मारून फिर्यादीला खालीपाडून कार्यालयाचा दरवाजा जोरात लोटून घेवून फिर्यादीचे हातापायाला दुखापत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सरकारी कामात जाणीवपूर्वक उडथळा निर्माण करून फिर्यादीला वाईट शिवीगाळ केली म्हणून फियादीने अकोले पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन येथज्ञे गुरनं ३३८/२१ भादविक ३५३,३३२, ३४२, ५०४,५०६ प्रमाणे तारीख २/९/२०२१ रोजी नोंदविण्यात आला होता. सदर खटल्याची सुनवणी संगमनेर येथिल सत्र न्यायाधीश श्री योगेश मनाठकर साहेब यांचे समोर इ आली. सदर खटल्यात सरकार पक्षा तर्फे साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे युक्तीवाद वेळी सरकार पक्षातर्फे
अति. सरकारी वकिल मच्छिंद्र गवते यांनी प्रबळ युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकुन घेतल्या नंतर व आरोपी दत्तात्रय विठ्ठल गोंदके याचे विरुद्ध गुन्हा शाबित झालेने
दि. ११/१०/२०२३ रोजी सत्र न्यायाधिश
योगेश मनाठकर यांनी आरोपीस ०३ महिन्याचा सश्रम कारावास व २०,०००/- द्रव्यदंड शिक्षा सुनावली.
खटल्याच्या सुनावणीचे वेळी सरकारी वकिलांना पोहेकॉ प्रविण डावरे, मपोकॉ स्वाती नाईकवाडी,मपोका दिपाली दवंगे, मपोका नयना पंडित, मपोका प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button