दिनविशेष पंचांग व राशिभविष्य दि ११/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १९ शके १९४५
दिनांक :- ११/१०/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति १७:३८,
नक्षत्र :- मघा समाप्ति ०८:४५,
योग :- शुभ समाप्ति ०८:४९,
करण :- गरज समाप्ति –:–,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,(०७:५९नं. चित्रा),
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०६प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१६ ते ०१:४४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२३ ते ०७:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:१९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:१६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:४१ ते ०६:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
व्दादशी श्राद्ध, संन्यासिनां महालय, चित्रा रवि ०७:५९, वाहन उंदीर, स्त्री.स्त्री.सू.चं.,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १९ शके १९४५
दिनांक = ११/१०/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका. संमिश्र घटनांचा दिवस. लाभाच्या काही संधी प्राप्त होतील. गुंतवणूक लाभदायक ठरेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल.
वृषभ
भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा. अती घाई टाळा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. चटकन निर्णयावर येऊ नका. मानसिक शांतता जपावी.
मिथुन
स्वत:वर खर्च करा. पराक्रम योग्य ठिकाणी दाखवा. नफा-तोट्याकडे लक्ष ठेवा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. कामातील बदलांना सामोरे जा.
कर्क
अती लोभ टाळावा. आपली जोखीम ओळखून कामे करा. दिलासादायक दिवस जाईल. कुटुंबातील सदस्य समजून घेतील. कामातून मनासारखे समाधान मिळेल.
सिंह
व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा. हातातील अधिकार वापरता येतील. नवीन अनुभव गाठीशी बाळगाल. आवडीच्या वस्तू खरेदी कराल. आनंद वार्ता मिळू शकतील.
कन्या
योग्य सल्ल्याने लोकांचे समाधान कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. जुन्या गोष्टी विसरून पुढे जा.
तूळ
नवीन संधीने खुश व्हाल. थोडी तडजोड करावी लागेल. अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींची गाठ पडेल.
वृश्चिक
प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची स्वतंत्र मते समजून घ्या. क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित कराल. वादाचे प्रसंग टाळा.
धनू
दिवस मनासारखा घालवाल. मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. समाधानकारक घटना घडतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.
मकर
तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य हरवू नका. समोरील प्रश्न शांतपणे सोडवावेत. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहा. धार्मिक ग्रंथांचे वाचन चालू ठेवा.
कुंभ
चटकन धाडसी निर्णय घेऊ नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. लाभाची संधी सोडू नका.
मीन
व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. शक्तीच्या जोरावर समस्या सोडवू शकाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर