इगतपुरीत अग्नि तांडव एका महिलेचा मृत्यू

,
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत आजनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण आग लागली
त्यानंतर घटनास्थळाला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे , केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत माहिती घेतली.
आतापर्यंत १४ जखमी कामगारांना रेस्क्यू करण्यात आले असून यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ११ जणांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कंपनीतील बॉयलरमचा भीषण स्फोट झाल्याने आग लागली. त्यावेळी आजूबाजूच्या गावांना याचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने १४ जणांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, एसएमबीटी मेडिकल कॉलेज, वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासह विविध रुग्णालयांत १०० बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती डॉ भारती पवार यांनी माध्यमांना सांगितले आगीत किती कामगार दगावले याची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आली नाही