इतर

आई-वडिलांच्या आशीर्वादाला पारखे होऊ नका – महंत बाबागिरी महाराज


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जीवन जगत असताना ज्ञानसंपादन करून कितीही मोठे व्हा, समाजात नावलौकिक मिळवा. कला कौशल्याच्या व सत् विचाराच्या माध्यमातून धनप्राप्ती करा मात्र आई-वडिलांच्या आशीर्वादाला कधीही पारखे होऊ नका.परमेश्वर समजून त्यांची सेवा करा जीवनात काहीही कमी पडणार नाही.असे मत काशी विश्वेश्वर देवस्थान नागलवाडीचे महंत बाबागिरी महाराज यांनी व्यक्त केले.
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील श्री नवनाथ बाबा देवस्थान मंदिरासमोरील आयोजित श्री क्षेत्र देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेल्या श्री नवनाथ ग्रंथ पारायण सांगता प्रसंगी धर्मनाथ बीज उत्सव आयोजित केला जातो. यावेळी आयोजित किर्तन सेवेत बाबागिरी महाराज यांनी आपले मत मांडले.धर्मनाथ बीज उत्सव हा गुरुपरंपरेचा उत्सव आहे. जीवनात गुरूंना मोलाचे स्थान आहे. आई-वडील हे जीवनातील पहिले गुरू असल्याने त्यांची सेवाही धर्मकार्यच समजून करा. धर्मकार्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र भाई मोदींचे कार्य ही धर्मकार्यच आहे म्हणूनच त्यांच्या कार्याचा साधु संतांना अभिमान वाटतो.
यावेळी विष्णु महाराज दुकळे, हरिभाऊ महाराज अकोलकर, भाऊसाहेब महाराज फटांगरे, अविनाश महाराज लोखंडे, भाऊसाहेब महाराज शेकडे, महेश महाराज शेळके, श्रीकृष्ण महाराज पैठणकर, भायगावचे सरपंच युवा नेते राजेंद्र आढाव, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप खरड, भगवान आढाव, शेषेराव दुकळे, सदाशिव शेकडे, दगडू दुकळे, डॉ. विजय खेडकर, मुरलीधर दुकळे, नानासाहेब दुकळे, हरिचंद्र आढाव,बापूराव दुकळे, संजय लांडे, काकासाहेब विखे, रंगनाथ आढाव, शिवाजी लांडे, डॉ.रवींद्र आढाव, माणिक शेकडे, रमेश आढाव, अमोल आढाव,बबनराव सौदागर, धोंडीराम ढोरकुले, यांच्यासह भायगाव परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तनानंतर विठ्ठल प्रल्हाद आढाव यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. तदनंतर बाजीराव संतराम शेकडे व विक्रम कारभारी ढाकणे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button