जिल्हा परिषद काळेगाव शाळेत योग दिन उत्साहात साजरा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा रोड वरील भातकुडगाव फाटा नजीक असणाऱ्या पुनर्वसित काळेगाव जिल्हा परिषद शाळेत नववा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर यांनी योग शिक्षक म्हणून काम पाहिले. तर शाळेचे सहशिक्षक लक्ष्मण पिंगळे यांनी त्यांना मदत केली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पडत असलेल्या आरोग्याच्या समस्यावर योगासने हा एकमेव पर्याय असून योगासनामुळे अनेक आजार बरेमुळासकट बरे होतात माणसांना आरोग्य लाभते. जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे.त्यासाठी आपण आपल्या जीवनात योगाला स्थान दिले पाहिजे असे मत योगशिक्षक संदीप आहेर यांनी मांडले. भातकुडगाव फाटा परिसरातील देवटाकळी, मजलेश्वर, हिंगणगाव ने, भातकुडगाव, जोहरापूर सह वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले.तर जिल्हा परिषद डिजिटल शाळा भायगावचे मुख्याध्यापक राम खरड यांनी योग शिक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व विशद करून योगाचे धडे दिले. जिल्हा परिषदच्या गुंफा शाळेच्या सह शिक्षिका मिरा नितनात व वासुदेव गाडे यांनी विद्यार्थ्यांना योगचे सांगुन योग प्राणायामाचे धडे दिले.

लिटल स्टार इंग्लिश स्कूल देवटाकळी येथील विद्यार्थ्यांनी योगा साधनेचे धडे घेतले. नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लिटल स्टार इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करून परिसरातील पालकांचे लक्ष वेधले यावेळी योगशिक्षक म्हणून शाळेच्या शिक्षिका कोमल खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.