अकोले आय टी आय संस्थेतील 95 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी

अकोले प्रतिनिधी – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षित विद्यार्थी हा औद्योगिक क्षेत्राचा उद्याचा महत्वाचा कणा असून त्याचे उत्तम आरोग्य असणे हे त्याला भावी जीवनात उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे रोटरी क्लब अकोले सेंट्रल ने राबविलेला मोफत आरोग्य तपासणी व रक्त गट तपासणी चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन डॉ. संदेश भांगरे यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेंट्रल आणि अकोले तालुका मेडिकल असोशियएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब चे सेक्रेटरी तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील नवले होते.
यावेळी रोटरी क्लब अकोले सेंट्रल सेक्रेटरी तथा आय. टी. आय चे सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, उपाध्यक्ष डॉ जयसिंग कानवडे, खजिनदार दिनेश नाईकवाडी, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, डॉ. रविंद्र डावरे आदी रोटरीयन्स, अकोले तालुका मेडिकल असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. सचिन नवले डॉ. संदेश भांगरे, डॉ. सांगळे व संस्थेचे प्राचार्य मच्छिन्द्र गायकर,सर्व निदेशक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. भांगरे पुढे म्हणाले की, आय. टी. आय. मधील प्रशिक्षण घेत असलेला विद्यार्थ्याला औद्योगिक क्षेत्रात काम करताना आरोग्य व मानसिक दृष्टया सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. यावेळी डॉ. भांगरे यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी सुरक्षितता ही पूर्ण वेळेची जबाबदारी समजून काम करावे व अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी.असे आवाहन केले.
यावेळी संस्थेत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेत असलेल्या 95 विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या कामी अकोले तालुका मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन नवले, डॉ. जयसिंग कानवडे, डॉ. रवींद्र डावरे, डॉ. संदेश भांगरे,डॉ. सांगळे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व योग्य ते मार्गदर्शन केले.
यावेळी अकोले तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष राजेश धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आय. टी आय. च्या विद्यार्थ्यासाठी एक वर्ष पुरतील प्रथमोपचाराचे मेडिसिन व साहित्य मोफत दिले.व आवश्यक ते नुसार पुढेही दिले जाईल असे सांगितले.
यावेळी प्राचार्य मच्छिन्द्र गायकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले.

रोटरी चे सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी उपक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
निदेशक अक्षय घुले, निलेश थटार, भरत धुमाळ, दौलत धुमाळ व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.