राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १७/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २५ शके १९४५
दिनांक :- १७/१०/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०४,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २५:२७,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २०:३१,
योग :- प्रीति समाप्ति ०९:२१,
करण :- तैतिल समाप्ति १३:२५,
चंद्र राशि :- तुला,(१४:२०नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रवि – तुला २५:२९,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:०९ ते ०४:३७ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१४ ते ०१:४२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:०९ ते ०४:३७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
सप्तरात्रोत्सवारंभ, रवि तुला २५:२९, मु. ३० साम्यार्घ, मु. रबिलाखर मासारंभ,
————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २५ शके १९४५
दिनांक = १७/१०/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ
कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्‍या येऊ शकतात.

मिथुन
भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल.

कर्क
जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका.

सिंह
प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. मानसिक शांतता राखावी.

कन्या
प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी.

तूळ
लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल. मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील.

वृश्चिक
गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तू खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग.

धनू
पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

मकर
कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका.

कुंभ
व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. वाहनाचे काम निघू शकते.

मीन
व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button