अकोल्यात हिंदू नववर्ष गुढी पाडवा दिनी भव्य दिव्य शोभायात्रा !

अकोले प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ नानिजधाम, जिल्हा रत्नागिरी( महाराष्ट्र ) यांच्या प्रेरणेने आज हिंदू नववर्ष गुढी पाडवा स्व स्वरूप संप्रदाय, उत्तर अहिल्यनगर अकोले तालुका बाजारतळ या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुंदर अश्या रथातून जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य अशी शोभायात्रा बाजार तळ, बस स्थानक रोड,, शिवाजी चौक,, नंतर कारखाना रोड मार्गे अंबिका लॉन्स या या ठिकाणी येऊन सर्व उपस्थित भाविक भक्तांनी सांगता आरती करून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
या शोभायात्रेत पारंपारिक भारतीय संस्कृतीचे जतन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श निर्माण करण्याच्या हेतूने विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते.
शोभायात्रेच्या प्रारंभी गुढीपाडवा स्वागत यात्रेचे मुख्य बॅनर, त्यांच्यामागे हातामध्ये विविध सेवेचे जगद्गुरु श्री चे संदेशांचे फलक घेतलेले भाविक भक्त, नंतर श्रीरामपुर तालुका चे वतीने घोड्यावर स्वार असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई,
निशान धारी महिला व पुरुष, त्यानंतर कलश धारी महिला, संगमनेर तालुका चे वतीने भजनी मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर आरुढ आणि मावळे सजीव देखावा, राहता तालुक्याच्या वतीने रामपंचायत सजीव देखावा अकोले तालुका चे वतीने आदिवासी नंदी नृत्य शंकर पार्वती गणपती आणि स्वामी समर्थ देखावा तालुक्याचे वतीने सुंदर असा प्रत्यक्ष वाघ्या मुरळी नृत्य होती नेवासे तालुका वतीने संत ज्ञानेश्वर सजीव देखावा
कोपरगाव तालुक्याचे वतीने संत शिरोमणी गजानन महाराजांचा सजीव देखावा तसेच जगद्गुरु श्रींची रथावर सिद्ध प्रतिमा स्थापन करून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो गुरुबंधू – भगिनी सहभागी झाले होते.
गुढीपाडवा हा सनातन हिंदू धर्म संस्कृतीचा नवीन वर्षाचा प्रथम दिवस तसेच वसंत ऋतु चा पहिला दिवस. आज या दिवसाला यश व विजयाचे प्रतीक म्हणून व प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या आगमनाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

याप्रसंगी या शोभायात्रेतून सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे दर्शन व जतन होऊन भावी पिढ्यांसाठी संस्कृतीची ओळख होऊन संस्कार केले जात आहेत.
सर्वांनी आपल्या श्रेष्ठ अशा हिंदू धर्माचे आचरण करून परमपूज्य जगद्गुरु श्रींनी दिलेल्या महान संदेशा नुसार तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा आणि स्वप्नात सुद्धा कोणाचेही वाईट चिंतू नका दहा मिनिटे वेळ काढून भक्ती करा म्हणजेच मनाच्या एकाग्रतेचा व्यायाम घ्या. अशाप्रकारे आपल्यातील अंधश्रद्धा व नकारात्मकता दूर होऊन विज्ञानाधिष्ठित अध्यात्म जोपासले जाईल व आपणास सुख शांती व समाधानाची प्राप्ती होईल.
सदर प्रसंगी उप पीठ उत्तर महाराष्ट्र अध्यात्मिक उपक्रम प्रमुख श्री दत्तात्रय उन्हाळे( मामा)जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक
श्री दादासाहेब मते साहेब आणि जिल्हा अध्यक्ष श्री सयाजी भडांगे साहेब अकोले तालुका अध्यक्ष श्री विकास नाईकवाडी यांनी सर्वांना नवीन हिंदू वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
शोभायात्रेत ठिक ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून महाप्रसाद देण्यात आला.
शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व जिल्हा सेवा समिती सदस्य,सर्व तालुका समिती सदस्य,सर्व संतसंग सेवा समिती सदस्य, तसेच जिल्ह्यातील सर्व महिला सेना, संग्राम सेना, युवा सेना व आजी-माजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.
