इतर
कंत्राटी कामगारांना न्याय द्या- ऊर्जामंत्री यांच्या कडे केली मागणी
नागपूर -भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे केंद्रीय सचिव मा.अभिजीत माहुलकर, केंद्रीय सह संघटन मंत्री मा.योगेश सायवनकर, नागपूर झोन संघटन मंत्री मा.सुकेश गुर्वे, नागपूर झोन कार्याध्यक्ष मा.विक्की जावळे, व संघटनेचे सभासद मा.महेश ढोके यांनी दि 16 आक्टोबर रोजी राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर भेट देत राज्य विद्युत क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली
तसेच 1 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर निघणाऱ्या मोर्चा चे निवेदन दिले या वेळी नामदार देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मिटींग आयोजित करून कामगारांना न्याय देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आस्वासन दिले आहे.