अमृतसागर दूध संघ अकोल्यातील दूध संस्थांना बल्क कुलर देणार- वैभवराव पिचड

अकोले प्रतिनिधी –
अमृतसागर दूध संघ दररोज 1 लाख दूध संकलन करीत असून त्यात अधिक वाढ व्हावी, व दुध नासण्याचे प्रमाणे कमी व्हावे या हेतूने तालुक्यातील दूध डेअरीना बल्क कुलर देणार असून त्याचाच एक भाग म्हणून श्रीकृष्ण सह दूध उत्पादक संस्था मर्या, ब्राह्मणवाडा या संस्थेस 5000 लिटर क्षमतेचा स्व मालकीचा बल्ककुलर व जीवनधारा सह. दूध संस्था मर्यादित ब्राह्मणवाडा या संस्थेस 3000 लिटर क्षमतेचा बल्क कुलर दिला आहे. देण्यात आला असल्याचे प्रतिपादन अमृतसागर सह दूध संघाचे चेअरमन तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
यावेळी अमृतसागर दूध संघांचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक गोरक्ष मालुंजकर,अप्पासाहेब आवारी,आनंदराव वाकचौरे, गंगाराम नाईकवाडी,अरुण गायकर,शरद चौधरी,जगन देशमूख,रामदास आंबरे,सुभाष डोंगरे,बाबुराव बेनके, सौ. अश्विनी धुमाळ, सौ. सुलोचना औटी, दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंढे,जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत,माजी संचालक प्रवीण धुमाळ,व भाऊसाहेब औटी, माजी संचालक रविंद्र हांडे, उपसरपंच सुभाष गायकर, दोन्ही संस्थाचे चेअरमन,पदाधिकारी, सचिव, कर्मचारी आदिसह अनेक मान्यवर हे उपस्थित होते.
यावेळी चेअरमन वैभवराव पिचड म्हणाले की, कोरोनाच्या संकटाच्या काळात शेती मालाला भाव नाही , त्यांच्या मुलांना रोजगार नाही अशा वेळी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी संघ उभा राहिला
मागील वर्षी दिवाळीला 2 रुपये रिबेट अमृतसागर दूध संघाने दिले आहे, .दूध संघामार्फत प्रत्येक दूध उत्पादकांच्या घरी पशुधन पर्यवेक्षक जाऊन पशुधनाची सेवा करीत आहे.ही सेवा आजही चालू आहे.दुध नासन्याचे प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारच्या योजनांची गेल्या 7 ते 8 वर्षात अंमलबजावणी करून तालुक्यात 38 बल्क कुलर दिल्याने दूध नासन्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. दूध उत्पादकांना गो धनासाठी चांगल्या दर्जाचे खाद्य देण्यासाठी अनेक कंपन्याशी संपर्क करून स्वस्तात देण्याचा मानस असल्याचे श्री.पिचड यांनी सांगितले.

दुधसंघाची अशीच गतिमान वाटचाल पुढेही चालू राहीन असे आश्वासित करून सर्वानी दुध उत्पादन वाढीसाठी चांगल्या गुण प्रतीचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा असे आवाहन वैभवराव पिचड यांनी केले.आणि दूध उत्पादकांचे मेळावे घेतले जातील असे सांगितले.व सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक, कर्मचारी, तसेच अमृतसागर दुध संघांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण दूध संस्थेचे संचालक गोकुळ आरोटे यांनी व सचिव गायकर यांनी सर्वांचे स्वागत केले.