रोहिदास धुमाळ यांची भाजप पंचायत व ग्रामविकास विभाग सेल च्या प्रदेश सह संयोजक पदी निवड

अकोले प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील भाजप चे निष्ठावंत कार्यकर्ते रोहिदास धुमाळ यांची भाजपच्या पंचायत व ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश च्या सह संयोजक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप – पंचायत व ग्रामपंचायत विकास विभागाचे प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप यांनी या नियुक्ती चे पत्र दिले आहे.
रोहिदास धुमाळ यांनी अनेक वर्षांपासून भाजप च्या विविध पदाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळून संघटना वाढीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव पाहुन जनतेच्या प्रगती साठी व कल्याणकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध जन कल्याणकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अथक परिश्रम घेतील. तसेच जनता व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास गणेश काका जगताप यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
सदर नियुक्ती चे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहिदास धुमाळ यांना दिले.
रोहिदास धुमाळ स्पष्ट वक्ते व पक्षाशी एक निष्ठ असून त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,माजी मंत्री तथा भाजप चे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड, भाजप अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री मा. आमदार वैभवराव पिचड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे, जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सौ. सोनाली नाईकवाडी, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, मच्छिन्द्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे,युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमूख, अमृतसागर दूध संघांचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्यू केशन सोसायटी चे अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकर देशमूख आदिसह अनेक कार्यकर्ते नेत्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.