इतर

अकोल्यात साडी चोळी देऊन केला नवं दुर्गांचा सन्मान

अकोले प्रतिनिधी

स्त्री म्हणजे शोषिक, सहनशील व्यक्ती,स्त्री म्हणजे मांगल्य,स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व,जेथे स्त्रियांना पूजनीय समजले जाते तेथे देव देवतांचा म्हणजे शक्तींचा वास असतो

,या कल्पनेतूनच ‘ सन्मान नव दुर्गांचा ‘ नवरात्रौत्सव निमित्ताने समाजातील पतीचे निधन झाल्यावर किंवा पती असूनही सांभाळ न करणाऱ्या एकल महिलांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत आपल्या स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने उभे राहिलेल्या एकल महिला पैकी प्रातिनिधिक स्वरूपात नव दुर्गांचा साडी चोळी मिठाई देऊन सन्मान करीत
त्यांच्या प्रति आदराची सदभावना व्यक्त करून अशा महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे काम रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या पदाधिकारी व सदस्यांनी केले.
नवरात्रौत्सवाचे निमित्त साधून रोटरी क्लब अकोले सेंट्रलने साऊ एकल महिला समितीच्या संयोजिका सौ. प्रतिभा हेरंब कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ‘ सन्मान नव दुर्गांचा ‘ हा उपक्रम राबवून एकल महिलांचा सन्मान केला.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा सारडा विद्यालयाचे प्राचार्य हेरंब कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार शांताराम गजे, कॉ. खंडूबाबा वाकचौरे, बबनराव तिकांडे, नगरसेविका सौ. शितल वैद्य, साऊ एकल महिला समितीच्या संयोजिका सौ. प्रतिभा कुलकर्णी, प्राचार्या दिलशाद सय्यद,रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष सुनील नवले, सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते,खजिनदार दिनेश नाईकवाडी, पब्लिक इमेज ह. भ. प. दीपक महाराज देशमुख, संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, माजी खजिनदार रोहिदास जाधव आदिसह साऊ एकल महिला समितीच्या सदस्या, आणि सन्मानार्थी नवदुर्गा उपस्थित होते

या नव दुर्गापैकी काही महिला पती नाही म्हणून किंवा पती सांभाळीत नाही म्हणून आपल्या मुला - बाळासाठी  कोणी ट्रॅक्टर चालवीतात, तर कोणी शेती करून 14- 14 पोते सोयाबीनचे उत्पादन काढीत आहे,तर कोणी मेडिकल स्टोर मध्ये काम करून, तर कोणी धुनी भांडी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. कोणी शिपाई म्हणून काम करीत आहे,कोणी शिलाई काम करीत आहे,कोणी शेती करीत आहे त्र कोणी मोलमजुरी करीत आहे एकीने तर पतीचे पतसंस्थेचे कर्ज फेडून आपला संसार संभाळीत आहे.अशा कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक आव्हानांना तोंड देत असलेल्या एकल महिला असलेल्या नव दुर्गांचा  सन्मान करण्यात आला.

यावेळी सौ. प्रतिभा कुलकर्णी यांनी या नव दुर्गांचा जीवन संघर्ष सांगताना सर्वजण भावुक झाले होते.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मीनानाथ पांडे, सेवा निवृत्त प्राचार्य शांताराम गजे, ह. भ. प. दीपक महाराज देशमुख, संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व या उपक्रमाचे स्वागत करून समाजातील अशा एकल महिलांच्या पाठीशी सर्वानी भक्कमपणे उभे राहू असे सांगितले.
रोटरी क्लब चे सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व शेवटी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button