शिरूर-निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्रा.संजय काशिनाथ देशमुख यांना शिरुर पंचायत समिती व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे शिक्षक संजय देशमुख यांनी शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे काम करत असताना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करत विविध उपक्रम राबवले
त्यांच्या कार्याची दखल घेत प्रा.संजय देशमुख यांना शिरुर पंचायत समिती शिक्षण विभाग व शिरूर तालुका शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले
.याप्रसंगी शिरूरच्या नायब तहसीलदार नेहा गिरी-गोसावी, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर,युवा उद्योजक राहुल करपे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, कार्याध्यक्ष रामदास थिटे,सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष अनिल शिंदे, बाळासाहेब चव्हाण,तुकाराम शिरसाठ, जुन्नरचे तालुकाध्यक्ष तबाजी वागदरे, विद्या विकास मंदिरचे प्राचार्य संजीव मांढरे, पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट तसेच पुरस्कार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले.प्रास्तविक मारुती कदम यांनी तर तुकाराम बेनके यांनी स्वागत केले.रामनाथ इथापे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रा.संजय देशमुख हे मूळचे कोतुळ (ता अकोले) येथील भूमिपुत्र आहे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांचे शिरुर तालुक्यात तसेच अकोले तालुक्यात कौतुक होत आहे.