अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात ८२ गावे आणि ४७२ वाड्यांवर पाणीटंचाई

दीड लाख नागरिकांच्या घशाला कोरड!

वसंत रांधवण
अहमदनगर/ प्रतिनिधी :
ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे पाणी टंचाईमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ८२ गावे आणि ७४२ वाड्यांवर टंचाईच्या झळा बसत असून याठिकाणी ७५ शासकीय टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

या टँकरव्दारे १ लाख ५३ हजार नागरिकांची तहान सरकारी पाण्याच्या टँकरवर भागवण्यात येत असून गणेशोत्सवाचा पहिला दिवस कोरडा गेल्याने सामान्य नागरिकांसह बळीराजाची धडधड वाढली आहे.


यंदा सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. खरीप हंगामात पेरणी झाल्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने हंगामातील पिकांचे ५० ते ९५ टक्क्यांपर्यंत पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. दुसरीकडे पाणी नसल्याने दिवसंदिवस पाणी टंचाईच्या झळा वाढतांना दिसत आहेत. आता कुठे सप्टेंबर महिन्यांचा पहिला पंधारवढा संपला असून पावसाची उघडीप कायम आहे. यामुळे सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या भरपावसाळ्यात वाढतांना दिसत आहे.
जिल्ह्यात सध्या सहा तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरकार पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र, पाऊस न झाल्यास त्यात झापट्याने वाढ होणार आहे.

जिल्ह्यात मंगळवार (दि.१९) अखेर ८२ गावे आणि ७४२ वाड्यांवर पाण्याचे सरकारी टँकर सुरू आहेत. अनेक तालुक्यात पाण्याअभावी टँकरची मागणी असून ते सुरू झाल्यावर टँकरची संख्या वाढणार आहे. कालपासून गणेशोत्सव सुरू झाला असून उत्सवाचा पहिला दिवस कोरडा गेल्याने अनेकांची धडधड वाढली असून लवकर पावसाला सुरूवात होवून बळीराजासह सर्वसमान्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी प्रार्थना बाप्पांना करण्यात आली आहे.

पारनेर तालुक्यातील ३५ गावे आणि २५३ वाड्यांवर २८ टँकर, संगमनेर तालुक्यातील १६ गावे आणि ४१ वाड्यांवर १२ टँकर, नगर तालुक्यातील १३ गावे आणि ४२ वाड्यांवर १२ टँकर, पाथर्डीत १३ गावे आणि १०२ वाड्यांवर १८ टँकर, कर्जत ३ गावे आणि २७ वाड्यांवर ३ टँकर, तर जामखेड २ अशा प्रकारे ८२ गावे ४७२ वाड्यांवर ७५ सरकारी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असुन या ठिकाणी असणाऱ्या १ लाख ५३ हजार ९४२ नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button